अनेक शेतकरी जलसंवर्धनाच्या गरजेबाबत अनभिज्ञ असतात किंवा त्यासाठी माफक खर्चात वापरता येतील अशा उपाययोजनांची त्यांना माहिती नसते. कोणते पीक घ्यायचे आहे आणि त्याची लागवड कशाप्रकारे करायची आहे, या गोष्टींनुसार शेतकऱ्याची पाण्याची गरज कमी-जास्त होत असते. पाणी हा शेतीसाठी लागणाऱ्या काही सर्वात महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे. एकूण पीक कसे येणार हे पाण्याच्या उपलब्धतेवरून ठरते आणि भारतामध्ये मान्सून कसा झाला याचा थेट परिणाम पाण्याच्या उपलब्धतेवर होत असतो आणि मान्सूनचे येणे हे बरेचदा बेभरवशाचे असते. म्हणूनच जल व्यवस्थापनाच्या चांगल्या पद्धती वापरल्याने लक्षावधी शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये मोठे परिवर्तन घडून येऊ शकेल. चांगल्या जल व्यवस्थापनासाठी पुढील काही गोष्टी करता येतील.
शेती हा एक असा व्यवसाय आहे, ज्याला प्रचंड देखभाल आणि तितक्याच चिकाटीची गरज असते. आपल्या पिकांची काळजी घेणे हाच शेतीचा मूळ अर्थ आहे आणि त्यासाठी अत्यंत खडतर कष्ट घ्यावे लागतात. जास्तीत जास्त आणि चांगले पीक घेण्यासाठी त्या त्या प्रांताचे हवामान, मातीचा दर्जा अशा अनेक घटकांचा योग्य मेळ साधला जावा लागतो. पण यातील सर्वात महत्त्वाचा घटक हा बहुधा पाण्याचा योग्य वापर हाच आहे. भूजलाचे महत्त्व समजून घेणे
पाणी हा शेतीला लागणारा अत्यावश्यक घटक आहे आणि पाण्याच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे शेतीच्या कामांवर होणारा खराखुरा परिणाम समजून घेणे अनेक शेतकऱ्यांना कठीण जाते. भूजल हा शेतीला होणाऱ्या जलपुरवठ्याच्या सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे. ते भरपूर प्रमाणात उपलब्ध असले तरीही आज संपूर्ण शेतीमध्ये भूजलाच्य व्यवस्थापनाकडे अपुरे लक्ष दिले जात आहे. बहुतांश पिकांना पूर्ण वाढीसाठी ४-२० एकर-इंच पाण्याची गरज असते. पाण्याचा प्रत्येक अतिरिक्त इंच पाणी हे तुमच्या पिकाला हायब्रीड आणि/किंवा कमाल पोषण पुरवठ्यासाठी वापरले जाते. जलधारण क्षमता
पिकासाठी लागणाऱ्या इतर प्रत्येक घटकाप्रमाणे पाणीसुद्धा योग्य प्रमाणात दिले जायला हवे व ते पिकांना योग्य वेळी मिळायला हवे, तरच पिकांची त्यांच्या संपूर्ण क्षमतेने वाढ होऊ शकेल. पिकांच्या वाढीच्या या महत्त्वाच्या टप्प्यांवर त्यांना खूप जास्त किंवा खूप कमी पाणी मिळाले तर उत्पादन लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. पर्जन्यमान, सिंचन आणि मृदेची पाणी धरून ठेवण्याची क्षमता या सर्व गोष्टी पिकांना किती पाणी मिळणार हे ठरवत असतात. आणि परिणामी हाती किती उत्पादन येणार यावरही परिणाम करत असतात. मातीच्या प्रकाराचा पाणी धरून ठेवण्याच्या/वाहून जाण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.
मातीमध्ये वाळूचे प्रमाण किती आहे, गाळ, चिकणमातीचे प्रमाण किती आहे किंवा त्यात या सर्व प्रकारांचे मिश्रण आहे, या गोष्टींवरून मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ठरत असते आणि पिकांना किती पाणी उपलब्ध होणार हे मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. चिकणमातीची जमीन पाणी धरून ठेवण्यासाठी खूप चांगली असते. पण ती खूपच जड आणि चिकट असल्याने अतिरिक्त पाणी वाहून जाणे ही कठीण होते. वाळूचे प्रमाण जास्त असलेली जमीन हा याच्या बरोबर उलट प्रकार आहे. या मातीतून पाणी वाहून जाण्याचे प्रमाण खूप जास्त असल्याने ते चांगल्या प्रकारे खाली झिरपू शकते, मात्र या मातीमध्ये आर्द्रता पकडून ठेवण्याची क्षमता नसते. पाण्याचा पुरेसा निचरा व्हावा आणि अधिक नियमित उत्पादन मिळावे यासाठी मातीचा योग्य प्रकार महत्त्वाचा ठरू शकतो.
जमिनीमधील पोषक घटकांची धूप टाळणे संपूर्ण वर्षभर पाण्यामुळे मातीच्या सुपिकतेवर मोठा परिणाम होत असतो. पिकांना वारेमाप पाणी दिले गेल्यास किंवा मोठा पाऊस पडल्यास मातीची धूप होते. या प्रक्रियेत मातीचा वरचा पातळ थर वाहून जातोच, पण त्याचबरोबर मातीमधील मौल्यवान सेंद्रिय पदार्थ आणि पोषक घटकही वाहून जातात. कोणत्याही प्रकारच्या मातीमध्ये या वरच्या थरामध्ये बहुतांश सेंद्रिय पदार्थ असतात आणि त्यांची हानी झाल्याने मातीमधील पोषक घटकांची उपलब्धता कमी होते व एकूणच कस कमी झाल्याने अंतिमतः त्याचा उत्पादनावर परिणाम होतो.
जलसंवर्धनाच्या नवीन पद्धतींचा वापर
तंत्रज्ञानाने आज बरीच मजल गाठली आहे आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नवनव्या शोधांचा अधिक पीक घेण्यासाठी फायदा घेणे ही आजच्या काळाची गरज आहे. वापरात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण अचूकपणे मोजून ते कमी-जास्त करून शकणाऱ्या कार्यक्षम सिंचन उपकरणांचा वापर केल्यास शेतकऱ्यांना पाण्याची बचत तर करता येईलच, पण त्याचबरोबर यंत्रणेची वापरामुळे होणारी झीजही कमी करता येईल.
पाणी वाहून जाण्याची यंत्रणा
पाणी वाहून जाण्याची अर्थात ड्रेनेजची व्यवस्था ही विशेषत्वाने वसंत ऋतूमध्ये उपयुक्त ठरते, कारण या काळात पाणी भरपूर दिल्यास नव्याने लावलेली रोपे आणि या थोड्या काळामध्ये लागवड करण्याची क्षमता यांना धोका निर्माण होतो. ही व्यवस्था पानगळीच्या काळात अधिकच महत्त्वाची बनते, कारण योग्य वेळी काढणीसाठी पिके कोरड्या स्थितीत असणे आवश्यक असते.
अशा काळात शेतीची ड्रेनेज यंत्रणा आणखी महत्त्वाची ठरते. आपल्या शेतामध्ये नियंत्रित ड्रेनेज यंत्रणा वापरून शेतकऱ्यांना चांगले पीक घेत येईल आणि कापणीच्या काळात चांगले उत्पन्न घेता येईल.
जलनियंत्रण यंत्रणा
पाण्यावरील नियंत्रणासाठीच्या गेट्समुळे एक प्रमाण ड्रेनेज यंत्रणेला पाणी धरून ठेवण्यासाठीच्या यंत्रणेमध्ये रूपांतरित करता येते, ज्यामुळे पिकाच्या चालू टप्प्यानुसार त्याला योग्य त्या प्रमाणात पाणी देता येते. या पद्धतीमुळे दुष्काळी भागांत तग धरू शकणाऱ्या पिकांची लागवड करणे शक्य होते. या पिकांना अधिक पाणी असलेल्या भागांतील पिकांप्रमाणे खोड किंवा शेंडा कुजण्याचा धोका नसतो. प्रत्यक्ष पिकावर कितीतरी बदलत्या घटकांचा परिणाम होत असतो, त्यामुळे परिणामकारक जलव्यवस्थापन यशस्वी शेतीसाठी किती फायदेशीर आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. जलव्यवस्थापनाचा प्रत्येक शेतकऱ्याला उपयोग होतो, मग पीक कोणतेही असो आणि शेताचा आकार केवढाही असो. पुरेसे पीक हाती लागणे हे प्रत्येक शेतकऱ्यासाठी या व्यवसायात टिकून राहण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. चांगले पीक यावे यासाठी प्रत्येक शेतकरी आपापल्या क्षमतेनुसार शक्य त्या सर्व गोष्टी करत असतो, पण आपल्या शेतातील पाणी आपल्या पिकाच्या फायद्यासाठी कटाक्षाने वापरणे हा पीक सुरक्षित ठेवण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. निसर्गाच्या कठोरतेसमोर शेतकऱ्याला हतबल वाटू शकते, मात्र व्यवहार्य पद्धतींचा वापर केल्याने मातीच्या आर्द्रतेचा प्रश्न सुटू शकेल व उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त पीक घेण्यासाठी वापर करता येईल.







