औरंगाबाद : सोयाबीन काढणीला एकरी 5 हजारांचा खर्च आला होता तर आता सोयाबीन 4600 रु. क्विंटल विकण्याचे संकट ओढावले आहे. दवाळी सणामुळे सोयाबीनची आवक सर्वसामान्य आहे. दरवर्षी या दविसांमध्ये सोयाबीनची आवक वाढतेच पण यंदाची स्थिती वेगळी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाने खराब झालेल्या सोयाबीनची विक्री करावी मात्र, चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची साठवणूक ही फायद्याचीच राहणार आहे, असे मत कृषितज्ञांनी व्यक्त केले आहे.
दवाळी सणाच्या तोंडावर सोयाबीनची आवक वाढत असली तरी दरात घसरण ही सुरूच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची साठवणूक ही शेतकऱ्यांच्या फायद्याचीच राहणार आहे. सध्या सोयाबीनला सरासरी 4800 रु. दर मिळत आहे. पण दर स्थिर नाही. शिवाय गतवर्षीपेक्षा यंदा उत्पादन कमी असतानाही दर कोसळले आहेत. याकरिता
सरकारचे धोरण आणि मध्यंतरी झालेल्या पावसाचे कारण आहे. पण दवाळीनंतर सोयाबीन दराबाबतचे चित्र स्पष्ट होणार असल्याने शेतकऱ्यांनी घाई न करता चांगल्या प्रतीच्या मालाची साठवणूक करणे आवश्यक असल्याचे मत कृषितज्ञ व्यक्त करीत आहेत.
आवक वाढण्याचे कारण
दरवर्षी दिवाळी सण आणि रब्बी हंगामाच्या तोंडावर सोयाबीनची आवक वाढत असते. राज्यात लातूरची बाजारपेठ ही सोयाबीनसाठी महत्त्वाची मानली जात असून सध्या 30 ते 35 हजार पोत्यांची आवक होत आहे. गतवर्षी याच काळात 70 ते 80 हजार पोत्यांची आवक झाली होती. मात्र, आता सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांची आर्थिक परस्थिती नाजूक असल्याने सोयाबीनची आवक वाढलेली आहे. ही काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.
साठवणुकीपूर्वी काय करावे ?
मळणी झालेले सोयाबीन हे सावलीमध्ये वाळवावे. वाळवताना थराची जाडी ही 5 सेंटीमीटरपेक्षा अधिक असू नये. अन्यथा आर्द्रता वाढून बुरशीचा धोका निर्माण होतो. कडक उन्हामध्ये सोयाबीन वाळवल्यास बियाणाच्या उगवण क्षमतेवर परिणाम होतो. साठवणुकीदरम्यान (मॉश्चइर) आद्रतेचे प्रमाण हे 8 ते 10 टक्केच असणे गरजेचे आहे, अन्यथा किडीचे प्रमाण वाढण्याचा धोका होतो. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी यंदा उशिराने पेरणी केली आहे. त्या सोयाबीनचे उत्पादन चांगले मिळू शकते.
असे काय होणार?
केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातही सोयाबीनच्या उत्पादनावर पावसाचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे क्षेत्र वाढले तरी त्या प्रमाणात उत्पादन वाढलेले नाही. सध्या सरकारने 12 लाख टन सोयापेंडची आयात केली असल्याचा बोलबाला आहे. त्याचा परिणामही दरावर होत आहे. मात्र, हे सोयापेंडही निकृष्ट दर्जाचे असल्यास सोयाबीनच्या दरात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सध्याचे दर काही कायम राहणारे नसून यामध्ये बदल निश्चित होणार असल्याचे सांगितले जात आहे.







