मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाकडून नवीन वर्षात घरांचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये कोकण मंडळाची नवीन घरांची सोडत जाहीर होण्याची शक्यता आहे. या संदर्भातील सविस्तर बातमी आपण खालीलप्रमाणे पाहणार आहो.
म्हाडाच्या कोकण मंडळाने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लॉटरी काढण्याची तयारी सुरू केली आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात या लॉटरीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते. फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये या घरांची प्रत्यक्ष सोडत काढण्याचे नियोजन म्हाडाकडून केले जात आहे.
घरांची संख्या आणि ठिकाणे
या आगामी सोडतीत अंदाजे २००० हून अधिक घरांचा समावेश असणार आहे. नवी मुंबईत विविध मोक्याची ठिकाणी ही घरे असू शकता. ठाणे, शिळफाटा, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, पनवेल, रार-बोळिंज, गोठेघर, भंडारली, कोणे आणि शिरढोण येथे ही घरे असू शकतात.
या सोडतीमध्ये विविध श्रेणींनुसार घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत, ज्यात: २०% सर्वसमावेशक योजना (या योजनेला नेहमीच मोठा प्रतिसाद मिळतो), १५% सामाजिक गृहनिर्माण योजना, प्रधानमंत्री आवास योजना (PMAY), ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजना असणार आहे.
मुंबई मंडळाचीही लॉटरी लवकरच
कोकण मंडळाच्या लॉटरीपाठोपाठ मार्च २०२६ मध्ये मुंबई मंडळाची देखील सुमारे ५००० घरांची सोडत जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जर कोकण मंडळाच्या लॉटरीत संधी हुकली, तर अर्जदारांना मुंबई मंडळासाठी पुन्हा प्रयत्न करण्याची संधी मिळेल.
पुणे लॉटरीचा निकाल आचारसंहितेमुळे सध्या प्रलंबित होता, आता आचारसंहिता संपल्यामुळे तो लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. सिडकोची ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ आणि ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या अंतर्गत सुमारे १९,००० घरांची प्रक्रिया आधीच सुरू आहे. याबद्दल आपण सविस्तर माहिती पुढील बातमीत देणार आहोत.
एकूणच, २०२६ हे वर्ष घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी अनेक संधी घेऊन येणार आहे. अधिकृत माहितीसाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर नेहमी भेट देने आवश्यक आहे. बाकी नवीन काही माहिती आल्यास आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहचवू.
वाचा : म्हाडाची मोठी भेट: मध्यमवर्गीयांसाठी १३०० घरांची लॉटरी!







