मुख्य मजकुराकडे जा
Wednesday, 4 November 2026ताज्या मराठी बातम्या • MarathiPaper.com
MarathiPaper

महाराष्ट्र आणि देश-विदेशातील ताज्या बातम्या

देश-विदेश · प्रकाशित: · लेखक: Piyush Kakulate

राज्यात कांद्याची मोठी आवक; नाशिकमध्ये दर वधारले, पाहा काय आहेत आजचे बाजारभाव

महाराष्ट्र: राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली असून दरांमध्ये देखील मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याला तब्बल ८,००० रुपये प्रति क्विंटल असा सर्वोच्च दर मिळाला आहे. तर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर (नायगाव) बाजार समितीत उन्हाळी कांद्याने ८,३१३ रुपये प्रति क्विंटल दर गाठला आहे.

राज्यातील विविध बाजार समित्यांमधील ४ नोव्हेंबर २०२६ रोजीचे बाजार भाव खालीलप्रमाणे आहेत:

१. लाल कांदा

सोलापूर: आवक ३,३२० क्विंटल | कमीत कमी दर ₹५,५०० | जास्तीत जास्त ₹८,००० | सर्वसाधारण ₹२,७००.
लासलगाव: आवक ४,२८१ क्विंटल | कमीत कमी दर ₹७०१ | जास्तीत जास्त ₹४,८१२ | सर्वसाधारण ₹४,३००.
लासलगाव – विंचूर: आवक २,५०३ क्विंटल | कमीत कमी दर ₹६०० | जास्तीत जास्त ₹४,६०१ | सर्वसाधारण ₹४,१००.
नागपूर: आवक ७०० क्विंटल | कमीत कमी दर ₹३,५०० | जास्तीत जास्त ₹४,५०० | सर्वसाधारण ₹४,२५०.
संगमनेर: आवक ३,७८८ क्विंटल | कमीत कमी दर ₹१,२०० | जास्तीत जास्त ₹५,२०० | सर्वसाधारण ₹३,२००.
मनमाड: आवक १,००० क्विंटल | कमीत कमी दर ₹१,८०० | जास्तीत जास्त ₹४,१०० | सर्वसाधारण ₹३,९००.

२. उन्हाळी कांदा

लासलगाव: मुख्य आवक केंद्र असलेल्या लासलगावमध्ये तब्बल ५२,४६२ क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. येथे कमीत कमी दर ₹८१, जास्तीत जास्त ₹४,५५२ तर सर्वसाधारण दर ₹४,१५० नोंदवला गेला.
सिन्नर (नायगाव): आवक ७६२ क्विंटल | कमीत कमी दर ₹३,५१३ | जास्तीत जास्त ₹८,३१३ | सर्वसाधारण ₹७,०००.
पिंपळगाव बसवंत: आवक ९,००९ क्विंटल | कमीत कमी दर ₹२,००० | जास्तीत जास्त ₹५,२११ | सर्वसाधारण ₹४,३००.
कळवण: आवक ८,८५० क्विंटल | कमीत कमी दर ₹२,००० | जास्तीत जास्त ₹५,५४५ | सर्वसाधारण ₹३,९०१.
येवला – आंदरसूल: आवक ६,२३१ क्विंटल | कमीत कमी दर ₹८०० | जास्तीत जास्त ₹४,१२५ | सर्वसाधारण ₹३,८००.
सटाणा: आवक ५,४०४ क्विंटल | कमीत कमी दर ₹१,७०० | जास्तीत जास्त ₹४,६६५ | सर्वसाधारण ₹४,०१०.

महाराष्ट्र्र राज्यात उन्हाळी कांद्याचा साठा मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याने आणि मागणी कायम असल्याने चांगल्या दर्जाच्या कांद्याला बाजारात चांगला भाव मिळत आहे. बहुतेक सर्वच प्रमुख बाजार समितीत कांद्याचा सर्वसाधारण दर ३,००० ते ४,३०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिला आहे.

शेवटचे अद्यतन: