सध्या रिफाईंड तेलाचा वापर वाढल्यामुळे चरबी वाढण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे लाकडी घाण्यातील शुद्ध तेलाचा खाण्याकरिता वापर व्हायला हवा, असे आहारतज्ज्ञांचे मत आहे. दीड वर्षांपासून तेलाच्या किमती अधिकच वाढल्याने अनेकजण जेवणात सर्रास रिफाईंड तेलाचा वापर करताना दिसत आहे. या तेलाचा अतिवापर शरीरासाठी घातक ठरतो. चरबी वाढण्यासह हृदय रोगाचाही धोका संभवतो. त्यामुळे बहुतांश नागरिक घाणा तेलाकडे वळू लागले आहे.
तळणाकरिता बहुतांश ठिकाणी पामतेलाचा वापर होताना दिसत आहे. मात्र, त्याचे सेवन करणे घातक ठरत आहे. हॉटेलमध्ये तळणाकरिता वारंवार एकाच तेलाचा वापर होत असल्याने तशा. पदार्थामुळे शरीरात अनावश्यक बाबींना चालना मिळाल्याने चरबी व विविध व्याधी वाढण्यास सुरूवात होते. पुढे मोठ्या आजारात रूपांतर होतात. त्यामुळे लाकडी घाण्यावरील शुद्ध तेलाचे सेवन केल्यास शरीराला आवश्यक असलेले हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन घटक आतड्यांमध्ये तयार होते.
आहारात शुद्ध तेलाचाच समावेश असावा. शुद्ध नैसर्गिक रसायन विरहित तेल खाण्यात आल्यास वात दोष संतुलित राहतो. हृदयरोग, कर्करोग, मूत्रपिंड आजार, सांधेदुखी, अर्धांगवायू, मेंदूचे आजार, उच्च रक्तदाब या गंभीर आजारावर लाकडी घाण्यावरील शुद्ध तेल अधिक गुणकारी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
घाण्याची तेल पौष्टिक
घाण्याल्या तेलात कोणत्याही प्रकारचे केमिकल वापरण्यात येत नाही. ते शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले जाते. तेलबियांवर योग्य दाब देऊन हे तेल काढले जाते. घाणा एका मिनिटात फक्त 13 ते 14 वेळा फिरतो. त्यामुळे घाण्याच्या तेलाचे तापमान 35 ते 40 डीग्रीपर्यंत राहत असल्याने शरीराला तेलातील नैसर्गिक पोषक घटक नष्ट होत नाही.
रिफाईंड तेल चरबी वाढण्यास कारणीभूत
रिफाईंड तेल हे अनेक केमिकलच्या वापरातून तयार केले जाते. विनाकेमिकल्सने ते तयारच होत नाही. गैसोलीन, सिथेटिक, अँटी ऑक्सिडेंट, हेक्झॅन आदी केमिकलचा रिफाईंड तेलासाठी वापर होत असल्याने 300 ते 464 डिग्री तापमानामुळे त्यातील फॅटी अॅसिड आधीच नष्ट होऊ जाते







