सीताफळ निर्यातीकरिता संधी

By Piyush Kakulate

Published On:

Follow Us

सीताफळाचे औषधी आणि आयुर्वेदीक गुणधर्म बहुमोलाचे आहेत, त्यामुळे केवळ रानात घेतले जाणारे फळपीक आता व्यावसायिक पद्धतीने घेतले जाते आहे. सीताफळाच्या ४० ते ५० विविध प्रजाती असून १२० जाती आहेत. अधिक उत्पादनासाठी अनेक जाती आहेत. बाळानगर ही मोठ्या फळाची चांगल्या गराची (४८ टक्के ) जात असून आपल्या हवामानात आणि जमिनीत चांगली येते. फुले पुरंदर (पारंपरिक) ९० टक्के, बालानगर, एन.एम.के. १ (मोठा आकार), अर्का सहान, ॲनोना २, धारूर ३ इ. जाती आहेत. सीताफळाच्या निर्यातीकरिता प्रामुख्याने एन.एम.के. १, अर्का सहान व गोल्डन या जाती वापरल्या जातात. सीताफळ हे अत्यंत नाशवंत असे फळ आहे.

पिकल्यानंतर १-२ दिवसांपेक्षा जास्त काळ साठविता येत नाही. फळांचा हंगाम सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत असतो, तर कधी कधी हा हंगाम जानेवारी पर्यंत देखील लांबतो. पिकलेल्या सीताफळामध्ये सर्वसाधारणपणे ५०: गर, २० : टीएसएस व ०.३० : आम्लता असते. एन. एम. के. १ सीताफळामध्ये गराचे प्रमाण ७०-७५ टक्के, बियांची संख्या १५-२० अस्ते. हे वाण निर्यातीकरिता लोकप्रिय आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ७०-८० टक्के फळांचा आकार एक सारखी असतात. या वाणाची सीताफळे ही वाहतुकीदरम्यान मजबुत राहतात आणि त्यामुळे निर्यातीदरम्यान त्यांचे कमी प्रमाणात नुकसान होते.

सीताफळ लागवडीखाली देशात सुमारे ४४००० हेक्टर क्षेत्र असून उत्पादन ३.६७ लाख मे. टन एवढे आहे. तथापी निर्यातीची आकडेवारी बघितली तर निर्यातीकरिता खूप मोठ्या प्रमाणात संधी आहेत असे लक्षात येते. सीताफळाचे राज्यातील पुणे, नंदुरबार, अहमदनगर, उस्मानाबाद व जळगांव या जिल्ह्यांमध्ये उत्पादन घेतले जाते. ताज्या सीताफळाचा व प्रक्रियामुक्त सीताफळाचा दिवसेंदिवस वाढत चाललेला वापर बघता अवर्षणग्रस्त भागांमध्येही व्यावसायिक पद्धतीने लागवड व्हायला लागली आहे. 

देशातील प्रमुख राज्यांमधील सीताफळाच्या उत्पादकतेची आकडेवारी वरीलप्रमाणे असून राज्याला उत्पादकतेमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. वैयक्तिक शेतकरी सीताफळाचे उत्पादन घेतात. सिताफळ उत्पादकांच्या सहकारी संस्था / कंपन्या खूपच कमी आहेत. सीताफळाची विक्री स्थानिक बाजारपेठ, स्थानिक व्यापारी किंवा कमिशन एजंट यांना केल्या जातात. आजकाल प्रक्रियादार देखील मोठ्या प्रमाणावर सीताफळांची खरेदी करतात. 

निर्यातः

सीताफळाची टिकवण क्षमता खूपच कमी असल्याने निर्यातीमध्ये मर्यादा आहेत. तरीही सुमारे ७००-८५० मे. टन सीताफळाची दरवर्षी निर्यात होत असते. गेल्या ३ वर्षामधील सिताफळाची निर्यात आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. 

सीताफळ निर्यात स्पर्धा:

सीताफळाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ सुमारे १० लाख मे. टन असून त्यामधील प्रमुख निर्यातदार देश व त्यांचा निर्यातीमधील वाटा खालीलप्रमाणे आहे. त्यामुळे सदर देशांकडून आपल्या देशाला निर्यातीकरिता स्पर्धा आहे. सीताफळाच्या मूल्य साखळीमधील मर्यादा: १. मर्यादित साठवणूक क्षमता ( काढणीनंतर ५ ते ८ दिवस)

२. फळ नाजूक असल्याने ताज्या सीताफळाच्या निर्यातीस मर्यादा.

३. सीताफळाच्या वरील कवचामध्ये मिली बग्ज सारखे कीटक सहजतेने वावर करू शकतात त्यामुळे निर्यातीस मर्यादा.

४. सद्यस्थितीमध्ये बहुतांश ठिकाणी मजुरांद्वारे हाताने पल्प काढला जातो. यामध्ये स्वच्छता राखण्यास मर्यादा आहेत. प्रति दिवस खूप कमी पल्पचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या हा न परवडणारा उद्योग ठरतो.

५. सीताफळाच्या पल्पला उणे २० डिग्री अंश सेल्शियस तापमानास साठवणूक करावी लागते किंवा फ्रिझ ड्रायनिंग तंत्रज्ञान वापरुन ड्राय करावे लागते. परंतु या तंत्रज्ञानास जास्त आर्थिक गुंतवणूक करावी लागते.

सीताफळाची मूल्यसाखळी विकसित करण्याकरिता उपाययोजनाः

१. उत्पादकांनी एकत्रित येऊन शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याची गरज आहे. यामुळे निर्यातीकरिता आवश्यक असलेल्या सोयी सुविधा, ब्रँडिंग, मार्केटिंग इ. सहज सोपे होऊ शकते.

२ प्रक्रिया (पल्प) उद्योगास वाव. राज्यात सुमारे ४०-४५ सिताफळ पल्प युनिट असून (वार्षिक क्षमता केवळ २००० मे. टन) ते प्रामुख्याने पुणे, सोलापूर, ठाणे, रायगड व नवी मुंबई येथे आहेत. पल्प निर्मिती हाताने करण्यापेक्षा छोटया क्षमतेचे का होईना परंतु स्वयंचलित युनिट बसवावे. अशा युनिटसोबत अॅसेप्टिक पॅकेजिंगची सुविधा उभारल्यास प्रक्रियायुक्त सीतफळास निर्यातीकरिता पुरवठा करता येऊ शकेल.

३. सीताफळाच्या वरील कवचामध्ये मिली बम्जसारखे कीटक सहजतेने वावर करू शकतात, त्यामुळे व्हेपर हिट ट्रिटमेंट केल्यास निर्यातीमधील अडचणी दूर होतात, याबाबत कृषि पणन मंडळाच्या वाशी येथील व्ही. एच. टी. सुविधेवर यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. नॅचरल आईसस्क्रिम ही कंपनी सुविधेचा सलग वापर करीत आहे.

४. शेतकरी स्तरावरच फळांची प्रतवारी झाल्यास फळांची हाताळणी कमी होऊन टिकवण क्षमता वाढेल. ५. फळांचे पॅकिंग कोरुगेटेड बॉक्समध्ये होणे गरजेचे आहे.

६. ग्राहकाभिमुख २-४ फळांचे पॅकिंग केल्यास ग्राहकाचा चांगला प्रतिसाद लाभू शकेल.

७. महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या आशियाई विकास बैंक सहाय्यित मॅग्रेट प्रकल्पामध्ये सीताफळाचा समावेश आहे. प्रकल्पाद्वारे सीताफळाची मूल्यसाखळी विकासाकरिता चालना मिळणार आहे.

८. सीताफळाच्या विक्रीकरिता राज्यातील महामार्गावर किंवा राज्य मार्गावर वातानुकूलित रिटेल शॉप उभारल्यास त्याचे काढणीपश्चात नुकसान कमी होणेस मदत होऊन त्यांना रास्त भाव मिळणेस मदत होईल.

९. सिताफळ उत्पादक संघामार्फत सीताफळाच्या विविध जातींचे संकलन करणेत आले आहे. त्यांचा अभ्यास कृषि विद्यापीठ स्तरावर करून त्याचा प्रचार व प्रसिध्दी करता येऊ शकते. या जातीमधील काही जातींचे सीताफळ पिकल्यावरही फुटत नाही. अशा जातींचे ब्रँडिंग करावे लागेल. बीड जिल्ह्यातील भौगोलिक स्थितीमुळे तेथील सीताफळामध्ये काही विशेष चव गुणधर्म आढळून आल्यामुळे बीड येथील सीताफळाला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. त्याचा ब्रँडिंगकरिता उपयोग करून घेऊन निर्यातीकरिता चालना मिळण्यास मदत होणार आहे.

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाने सन २००२ मध्ये वाशी, नवी मुंबई येथे व्हेपर हीट ट्रिटमेंट सुविधा जपान फळमाशी विरहित आंबा निर्यातीकरिता उभारली असून सदर सुविधा आता सीताफळासारख्या इतर फळांकरितादेखील वापरल्या जात आहेत. काही प्रक्रियादार यांचेसोबत सदर सुविधेवर सीताफळावर सुरुवातीच्या काही प्रायोगिक चाचण्या केल्यानंतर सदरील चाचण्याचे रिझल्ट यशस्वी झालेनंतर व्यापारी तत्वावर सीताफळावर प्रक्रिया करण्यात येत असून अद्याप सुमारे १००० मे. टनापेक्षा जास्त सीताफळांवर देशातंर्गत बाजारपेठेकरीता प्रक्रिया करण्यात आली आहे. सदर प्रक्रिया करुन थ्रीप्स व फळमाशी किडविरहित सीताफळाची विविध देशांमध्ये निर्यात करणे शक्य झाले आहे.

Based in Nashik, Maharashtra, I Am a Founder Editor for marathipaper, Covering Politics, Property, agriculture, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at piyushkakultensk@gmail.com

Leave a Comment