Homeताज्या बातम्याधान्य चोरताना शेतकऱ्यांनी चोरट्यांना रंगेहाथ पकडले; सिल्लोड तालुक्यातील घटना

धान्य चोरताना शेतकऱ्यांनी चोरट्यांना रंगेहाथ पकडले; सिल्लोड तालुक्यातील घटना

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील भवन येथील शेतात दोन शेतकऱ्यांनी मका व गहू मळणी करून त्याचे कट्टे भरून ठेवले होते. शेतात कुणी नसल्याची संधी साधून दोन चोरट्यांनी हे कट्टे वाहनात टाकून लांबवले. मात्र शेतकऱ्याने शिताफीने दोन्ही चोरट्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना ११ मे रोजी उघडकीस आली. भागीनाथ सखाराम कळम (३६) व अजिनाथ भानुदास कळम (दोघेही रा. भवन) असे पकडलेल्या आरोपींचे नाव आहे.

कळम येथील काकासाहेब रामकृष्ण कळम (४६) या शेतकऱ्याने त्यांच्या गट क्र. १७४ मधील शेतात मकाची मळणी झाल्यानंतर तीन कट्टे मका थप्पी लावून ठेवली होती. त्याचप्रमाणे शेतकरी संजय भाऊराव कळम यांनीही त्यांच्या शेतात एका कट्ट्यात गहू भरून ठेवला होता.

आरोपी भागीनाथ व अजिनाथ या दोघांनी १० मे रोजी आधी गहू व मका चोरून एका शेतातील मकाच्या कडब्याखाली लपवून ठेवला व दुसऱ्या दिवशी ११ मे रोजी संधी साधून संध्याकाळी त्यांनी एक लोडिंग वाहन (क्र. एमएच २० इजी. ३६३४) आणून त्यात तो घेऊन चालले होते.

याबाबतची माहिती शेतकरी काकासाहेब व संजय यांना अगोदर मिळाली होती. त्यांनी सापळा रचून या दोघांना रंगेहाथ पकडले. याबाबत माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे व पोलीस नाईक दादाराव पवार यांनी घटनास्थळ गाठून आरोपींना जेरबंद केले. चोरलेला माल (एकूण किंमत ३,९६० रुपये) जप्त करुन गुन्हा दाखल केला.

वाहन केले होते भाड्याने…

आमचे धान्य बाजारात विक्रीसाठी आणायचे आहे असे सांगून सदर भामट्यांनी बाजारातून लोडिंग वाहन भाड्याने आणले होते. यात वाहन चालकाचा काहीही दोष नव्हता व चोरीत त्याचा सहभाग नसल्याने पोलिसांनी वाहन चालकास सोडून दिले.
लातूरच्या बाजार समितीत शेतमालाची आवक घटली

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Recent Post