Homeदेश-विदेशभयंकर मगरी घरात पाळते ही तरुणी

भयंकर मगरी घरात पाळते ही तरुणी

तैवान : असे म्हणतात की, पाण्यात राहून मगरीशी वैर करणे साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. याचा अर्थ आपल्या सर्वांना माहिती आहे की, मगर हा पाण्यातील सर्वात आक्रमक शिकारी प्राणी आहे. मगरीच्या जबड्यात जो कोणी प्राणी सापडेल तो जिवंत वाचण्याची शक्यता जवळपास शून्य असते.

तुम्हाला आश्चर्य वाटेल की, अशा या भयंकर मगरी एका तरुणीने आपल्या घरात पाळल्या आहेत. आपल्या घरात तिने मगरींसाठी एक बेडरूम तयार केली आहे. तैवानमध्ये राहणाऱ्या साशिमी नावाच्या तरुणीला मगरी पाळण्याचा छंद आहे. एखाद्या पाळीव कुत्र्यांप्रमाणे ती मगरींशी वागते. त्यांना जवळ घेते. गोंजारते आणि त्यांचा मुकाही घेते. साशिमीच्या घरात एक दोन नव्हे तर सहा भल्या मोठ्या मगरी आहेत. या मगरींना साशिमी आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे वागणूक देते. तिच्या घरात या मगरी अगदी वाट्टेल तिथे फिरत असतात.

साशिमीने सर्वात पहिल्यांदा तैवानमधील एका अॅनिमल ब्रिडरकडून मगरीचे एक पिल्लू विकत घेतले होते. तेव्हापासून तिला मगरी पाळण्याचा छंदच जडला. एकापाठोपाठ एक अशा सहा मगरी तिने खरेदी केल्या. या मगरींनाही तिच्या सहवासाची सवय लागली. नैसर्गिकपणे आक्रमक असलेल्या या मगरी साशिमीशी अगदी पाळीव कुत्र्याप्रमाणे प्रेमाने वागतात. सहापैकी एकाही मगरीने कधीही साशिमीवर हल्ला केलेला नाही.
वयाच्या ७० व्या वर्षी पुन्हा बाप बनणार पुतीन

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Recent Post