OMG! पाच दिवसांमध्ये दोन वेळा प्रेग्नंट राहिली ही महिला

woman pregnant twice
Photo: Social media

टेक्सास : वैद्यकीय क्षेत्रात फार दुर्मीळ मानला जाणारा असा एक प्रकार नुकताच घडला आहे. कॅलिफोर्नियातील एका महिलेला पाच दिवसांच्या काळात चक्क दोन वेळा गर्भधारणा झाली. या प्रकाराला वैद्यकीय भाषेत सुपर फिटेशन असे म्हणतात. कारा विनहोल्ड नावाच्या या महिलेने दोन बाळांना जन्म दिला आहे. मात्र, ती जुळी मुले नाहीत. कारण त्यांचे गर्भ आईच्या उदरात पाच दिवसांच्या अंतराने स्वतंत्रपणे वाढले होते.

म्हणूनच एकाच वेळी जन्म होऊनही ही मुले जुळी मानली जाऊ शकत नाहीत. काराचे गेल्या वर्षी मिसकॅरेज झाले होते. म्हणजे तिचा काही कारणांनी मध्यातच गर्भपात झाला होता. त्यामुळे कारा निराश होती; परंतु या वर्षी तिला एका वेळी दोन मुलांचा लाभ झाल्याने ती खूप आनंदी आहे.

काय असते सुपर फिटेशन?
जेव्हा एक स्त्रीबीज फर्टिलाईज होऊन गर्भवतीच्या उदरात वाढत असते आणि त्याच वेळी जर दुसरे स्त्रीबीज पुन्हा स्पर्मच्या संपर्कात आल्याने फर्टिलाईज होते, तेव्हा या परिस्थितीला सुपर फिटेशन असे म्हणतात. सुपर फिटेशन हा प्रकार एवढा दुर्मीळ आहे की, जगभरात अशा प्रकारच्या केवळ १०१२ घटना घडल्या आहेत.
Viral: तब्बल ११ लाख रुपये खर्च करून माणूस बनला ‘कुत्रा’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here