संगमनेर बाजार समितीत कांद्यास २ हजारांचा भाव

onion
photo: social media

नगर: संगमनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ७ हजार ४४२ कांदा गोण्याची आवक झाली असून एक नंबरच्या कांद्याला १५०० ते २००१ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांनी दिली.

काल झालेल्या कांदा लिलावामध्ये एक नंबरच्या कांद्यास १५०० ते २००१, दोन नंबरच्या कांद्याला १००० ते १५००, तीन नंबरच्या कांद्यास ५०० ते ८०० रुपये, गोलटी कांद्याला ३०० ते ७००, खाद कांद्याला १५० ते ३५१ प्रमाणे बाजार भाव मिळाला आहे. आठवड्यातून सोमवार ते शुक्रवार या सलग पाच दिवशी कांद्याचा लिलाव सुरू असतो तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याला कवडीमोल भाव मिळत होता. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता. परंतु गेल्या दोन-तीन दिवसांपासून कांद्याच्या भावामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यामध्ये समाधान आहे.

श्रीरामपुरात कांदा १ हजार ४६३ रुपयांवर

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याची लूज मार्केटमध्ये ८३ साधने आली. एकूण १३०४ क्विंटल आवक झाली.

एक नंबर कांद्याला ९५० ते जास्तीत जास्त १४६३ रु. क्विंटल, दोन नंबर कांद्यास ६५० ते ९०० व तीन नंबर कांद्यास ३५० ते ६०० क्विंटल, तसेच गोल्टी कांदा कमीत कमी ८५० ते जास्तीत जास्त १०५० रुपये बाजारभाव निघाले. शेतकऱ्यांनी आपला कांदा मार्केटमध्येच विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव किशोर काळे यांनी केले आहे.

भुसार मार्केटमध्ये हरभरा या शेतमालाची ५ क्विंटल आवक झाली. ३५०० ते ३८०० व सरासरी रुपये ३७०० भाव निघाले. सोयाबीन या शेतमालाचे २० क्विंटल आवक झाली. ५८५० ते ५९५० व सरासरी ५९०० भाव निघाले. तुरीची ३ क्विंटल आवक झाली. ४८०० बाजारभाव निघाले. उडीद शेतमालाचे १ क्विंटल आवक झाली, रुपये ३७०१ बाजारभाव निघाले.

बटाट्याची १८२ क्विंटल आवक झाली. कमीत कमी १६ रुपये व जास्तीत जास्त १९ रुपये किलो व सरासरी १७ रुपये किलो या दराने निघाले.

हिरवी मिरची या शेतमालाचे २३ क्विंटल आवक झाली. कमीत कमी ३० रुपये किलो, जास्तीत जास्त ४० रुपये किलो व सरासरी ३५ रुपये किलो या दराने निघाले. टोमॅटो या शेतमालाचे २३ क्विंटल आवक झाली. कमीत कमी ४० रुपये किलो, जास्तीत जास्त ५० रुपये किलो व सरासरी ४५ रुपये किलो या दराने निघाले. शेतकऱ्यांनी आपला कांदा, तसेच भुसार माल स्वच्छ करून बाजार समितीमध्ये विक्रीस आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी हिताचा निर्णय, मिळणार ५० हजारांचे अनुदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here