Homeआरोग्यतापमानाने गाठला उच्चांक; वन्यप्राणी, पशु-पक्ष्यांची अशी घ्या काळजी!

तापमानाने गाठला उच्चांक; वन्यप्राणी, पशु-पक्ष्यांची अशी घ्या काळजी!

सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त झाले आहे. साधारणतः मार्च ते मे महिन्यापर्यंत तापमानाचा पारा अधिक प्रमाणावर चढतो. या काळात आपण सारे मनुष्य आपल्या आरोग्याची काळजी घेतो. तशी काळजी पशुपालकांनी आपल्या पशु व पक्ष्यांची सुद्धा घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या सहाय्यक संचालक डॉ. नम्रता वाघमारे यांनी केले आहे..

कडक उन्हाळ्यातील तापमानाचा जनावरांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो. हा परिणाम जनावरांच्या आहार, प्रजनन क्षमता आणि दूध उत्पादनावर दिसून येतो. लहान वासरांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊन त्यांच्या वाढीवर ह्याचा दुष्परिणाम दिसून येतो.

गाय व म्हैस यासारख्या दुधाळ जनावरांचे शरीराचे सामान्य तापमान 101 डिग्री फॅरेनहाईट ते 102 डिग्री फॅरेनहाईट असते. सर्व उष्ण रक्ताच्या प्राण्यांमध्ये, वातावरणातील तापमानात झालेला जो बदल असतो त्या तापमानाशी जुळवून घेऊन त्यांचे शरीराचे तापमान कायम ठेवण्याची त्यांच्यात क्षमता असते. परंतु अतिउष्ण हवामानाचा मात्र आरोग्यावर प्रतिकूल परिणाम दिसून येतो. अशा उष्ण हवामानात शरीरास अतिरिक्त पाण्याची गरज भासते. लहान वासरे, करडे यांच्या शारीरिक वाढीवर दुष्परिणाम होतो आणि ते उष्माघातास किंवा इतर आजारास बळी पडतात.

दुधाळ जनावरांना एक लिटर दुधासाठी 4 ते 5 लिटर पाण्याची गरज असते. याशिवाय शरीराकरितासुद्धा पाणी लागते. जनावरांना पिण्यास पाणी कमी पडले, तर उष्माघाताची लक्षणे दिसून येतात उदा. ताप, चक्कर अशातऱ्हेने जनावर उष्माघातास बळी पडतात.

बाहेरील वातावरणाचे. तापमान शारीरिक तापमानापेक्षा जास्त असल्यामुळे बाहेरील उष्णता शरीरात शोषली जाते व शारीरिक तापमान स्थिर राहू शकत नाही. विदेशी संकरित गाई-म्हशी यांना या उन्हाळ्यातील उष्णतेचा अधिक त्रास होतो.

30 डिग्री से. ते 35 डिग्री से. पर्यंतचे सहन करू तापमान कोंबड्या शकतात. या उच्च तापमानाचा कोंबड्यांच्या शारीरिक क्रियेत बदल होतो. त्या उष्माघातास बळी पडतात. मानवाप्रमाणे जास्त उष्णतेला प्रतिसाद देण्यासाठी कोंबड्यांना घर्म ग्रंथी नसतात. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी तोंडाची उघडझाप करतात, जास्त प्रमाणात धापा टाकल्यामुळे त्यांच्या शरीरातील उष्णता बाहेर टाकली जाते. परंतु सततची उघडझाप केल्यामुळे कोंबड्यांच्या शरीर क्रियेत रासायनिक बदल होतात. त्यामुळे कोंबड्याचीही निगा राखण्याची गरज आहे.

…अशी करा उपाययोजना

जनावरांना बांधण्याची जागा ‘गोठा’ सावलीत असावा. सावलीसाठी हिरवे कापडाचे शेड बांधावे. शक्यतो जनावरांना झाडाच्या सावलीत थंड जागी बांधावे. शक्य असल्यास गोठ्यात कुलर किंवा पंखा लावावा जेणेकरून जनावरांचे शारीरिक तापमान कायम राहण्यास मदत होते. त्यासाठी गोठ्याच्या सभोवताल सावली देणारे वृक्ष असावीत, असे नियोजन करणे आवश्यक आहे. त्याचा फायदा उन्हाळ्यात होतोच. जनावरांच्या अंगावर थंड पाण्याचे फवारे फवारावे, अंगावर ओले पोते टाकावेत, उन्हाच्या आत जनावरे चरून येतील असे नियोजन करावे.

शेळ्यांची अतिकाळजी घेण्याची गरज

शेळ्यांच्या बाबतीत सुद्धा अशाच पद्धतीने दक्षता घेणे आवश्यक आहे. गाभण शेळ्या, लहान करडे यांच्या शेडमध्ये सुद्धा थंडावा राखावा. पिण्यास थंड पाणी द्यावे. त्यांच्या लहान करडाना उन्हात बाहेर सोडू नये. मोठ्या शेळ्या सकाळी चरावयास सोडाव्या व उन्हाच्या आधी गोठ्यात परत येतील ही काळजी घ्यावी.

अशी करा उपायोजना

  • शेडमध्ये हवा खेळती राहील असे
  • पूर्व-पश्चिम शेड बांधणीची रचना करावी.
  • उन्हाळा सुरू होण्यापूर्वी छताची सफाई करून पांढऱ्या रंगाने रंगवावे.
  • शक्य असल्यास शेड मध्ये पंख्याचा वापर करावा. एक्झॉस्ट पंखा लावावा. जेणेकरून शिळी हवा बाहेर जाईल.
  • शेडमध्ये पिण्याच्या पाण्याची भांडी वाढवावी.
  • पक्ष्यांचे खाद्य सकाळी व संध्याकाळी द्यावे, उन्हाच्या वेळेत खाद्य टाकू नये.
  • उन्हाळ्यातील दिवसात मांसल पक्ष्यांना खाद्यात पूरक क्षार प्रमाणात दिले तर त्यांची पाणी पिण्याची क्षमता वाढते.
  • उन्हाळ्यात लसीकरण पहाटेच्या वेळेत करावे. लसीची साठवण थंड ठिकाणी जेणेकरून लस खराब होणार नाही.

आवक घटली तरीही बेदाण्याला भाव कमीच, व्यापाऱ्यांनीही फिरवली पाठ

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Recent Post