Homeताज्या बातम्यायावर्षी २ मेपासून शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर

यावर्षी २ मेपासून शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर

मुंबई : मागील काही दिवसांपासून अभ्यासक्रम पूर्ण न झाल्यामुळे शाळांच्या उन्हाळी सुट्ट्यांबाबत अनेक तर्क-वितर्क काढले जात होते. अखेर राज्य सरकारने गुरुवारी याबाबतची घोषणा करत शाळांना २ मेपासून सुट्टी जाहीर केली. त्याचबरोबर यंदाची उन्हाळी सुट्टी १२ जूनपर्यंत असणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून सुरू होणार आहे.

मात्र विदर्भातील शाळा मात्र उन्हाळ्याची तीव्रता पाहता २७ जूनपासून सुरू होणार आहे. यावर्षी शाळांना उन्हाळ्याची सुट्टी मिळणार नाही, याबाबतची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगू लागली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून पालक वर्ग तसेच शिक्षकांमध्ये देखील कमालीची अस्वस्थता पसरली होती.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्याची घोषणा सरकारने केली. उन्हाळ्याची दीर्घ सुट्टी कमी करून या सुट्ट्या दिवाळी, गणेशोत्सव किंवा नाताळ सारख्या सणांच्या वेळेस देता येणार आहेत. या सुट्ट्या देण्याचा अधिकार स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांना असणार आहे. मात्र या सुट्ट्या देताना त्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या संचालकांनी हे आदेश दिलेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Recent Post