सोयाबीनच्या दरात पुन्हा तेजी; ७५०० हजार रुपयांचा टप्पा पार, आवकही वाढली

soyabean trader
photo: social media

जालना: जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या ज्वारी, गव्हाची आवक वाढली आहे. गव्हाला सरासरी २४५० तर ज्वारीला २२०० रुपयांचा दर मिळत आहे. दरम्यान, मागील आठवड्याच्या तुलनेत मका व बाजऱ्याच्या दरात काहीशी घट झाली आहे. मक्याला प्रतिक्विंट २००० रुपयांचा दर मिळत आहे. दरम्यान,मोंढ्यात सोयाबीनच्या दरात पुन्हा तेजी आली असून, आवकही वाढली आहे.

बाजार समितीध्ये शनिवारी सोयाबीनची सुमारे २१०० क्विंटल आवक झाली होती. खरीप हंगामातील सोयाबीन काढणी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात सोयाबीनला चांगला दर मिळाला. मधल्या काळात दर कमी झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री न करता घरातच ठेवले होते. मागील तीन महिन्यात सोयाबीनचे दर कमी झाले होते. मात्र, आता सोयाबीनला पुन्हा चांगला दर मिळत आहे. सध्या सोयाबीनला किमान ६३०० ते कमाल ७५०० हजार रुपयांचा भाव मिळत आहे. सरासरी भाव ६६०० भाव मिळत आहे. तुरीचे दर काही प्रमाणात कमी झाले आहे. पांढऱ्या तुरीला कमाल ६१०० तर सरासरी ५८५० रुपयांचा दर मिळत आहे.

दरम्यान, बाजार समितीमध्ये गहू, मका, ज्वारी, हरभरा या मालांची आवकही स्थिर आहे. गव्हाला कमाल २४५० तर किमान १९०० रुपयांचा दर मिळत आहे. मका पिकाला कमाल २१९५ तर किमान १८६० रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. बाजरीच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. बाजरीला कमाल २१७५ तर किमान १६०० रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे. दरम्यान, लाल गुळाला सरासरी दर २९३१ रुपयांचा भाव आहे. सूर्यफूल व राईला चांगला भाव असला तरी आवक नसल्याचे व्यापारी सांगत आहेत.
शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी हिताचा निर्णय, मिळणार ५० हजारांचे अनुदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here