Solapur Onion Market : सोलापूर बाजार समितीत कांद्याचे दर गडगडले

onion
Photo: Social media

सोलापूर : सद्यस्थितीत कांद्याचे दर गडगडलेले आहेत. कांदा विक्रीतून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सद्यस्थितीत कांद्याचा सरासरी दर प्रतिक्विंटल १ हजार २०० रुपये इतका आहे.

शुक्रवारी, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोलापूर जिल्ह्यासह उस्मानाबाद, बीड, राहुरी, अहमदनगर, लातूर, विजयपूर, गुलबर्गा, लासलगाव या परिसरातून २१० ट्रक्समधून २१ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. दर प्रतिक्विंटलासाठी १०० रुपये ते ३ हजार रुपयांपर्यंत आहेत. उच्च प्रतिच्या कांद्यास क्वचितच ३ हजाराचा दर मिळतो आहे. अन्यथा सरासरी प्रतिक्विंटल १ हजार ते १ हजार २०० रुपयांपर्यंतच कांद्याची विक्री होत आहे. कांदा उत्पादनास एकरी ४० ते ५० हजार रुपयांचा खर्च होतो आहे. पण, दर कमी असल्याने लागवडीवर झालेला खर्च मिळणेही मुश्किल झाले आहे.

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या ज्वारी, गव्हाची आवक वाढली स्थिर आहे. गव्हाला सरासरी २७५० तर ज्वारीला कमाल ३८०० व किमान २८०० रुपयांचा दर मिळत आहे. दरम्यान, मागील आठवड्याच्या तुलनेत ज्वारीचे दर काही प्रमाणात वाढले आहे. सध्या हिवाळा सुरू असल्याने नागरिक बाजरीला खान्यात प्राधान्य देत आहेत. त्यामुळे बाजरीच्या दरात वाढ झाली आहे. बाजरीला प्रतिक्विंटल कमाल ३१०० हजार रुपयांचा दर मिळत आहे.

बाजार समितीध्ये शुक्रवारी सोयाबीनची सुमारे २७६८ क्विंटल आवक झाली होती. सोयाबीनला काल पाच हजार ५३० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. बाजार समितीमध्ये गहू, मका, ज्वारी, हरभरा या मालांची आवकही स्थिर आहे. गव्हाला आज कमाल ३००० तर किमान २६०० रुपयांचा दर मिळत आहे. मका पिकाला कमाल २१६० तर किमान १९०० रुपयांपर्यंतचा दर मिळाजा. बाजरीला कमाल ३१०० तर किमान २७३१ रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे. दरम्यान, मोंढ्यात आज ज्वारी १९५ क्विंटल आवक झाली होती. ज्वारीला कमाल ३८०० तर किमान २८०० रुपयांचा दर मिळाला. दरम्यान, मोंढ्यात लाल गुळाला तीन हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत असून, रेशीम कोषाला सरासरी ६१ हजारांचा दर मिळत आहे.
हे पण वाचा : Cotton Rate : खासगी व्यापाऱ्यांनीही पाडले कापसाचे भाव! आठ हजारांपर्यंत भाव घसरल्याने थांबविली विक्री