पेरणीपूर्वी रासायनिक खतांचा तुटवडा! शेतकरी चिंतेत

Fertilizer

अमरावती: मृग नक्षत्राला सुरुवात होऊन पाच दिवस झाल्याने शेतकरी मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे. किमान आठ दिवस प्रतीक्षा करावी लागेल, असा वेधशाळेचा अंदाज आहे. दरम्यान काही शेतकरी बी-बियाणे, खतांची खरेदी करीत आहे.

यामध्ये सोयाबीन बियाण्यासह एमओपी, डीएपी, अमो. सल्फेट या रासायनिक खतांचा साठा कमी असल्याने काही प्रमाणात तुटवड्याची शक्यता आहे. कृषि विभागाचे माहितीनुसार यंदाच्या खरीपासाठी १,१४,९४० मे टनाचे आवंटन मंजूर आहे. त्यातुलनेत सद्यस्थितीत ४८,३३४ मे. टन रासायनिक खतांचा पुरवठा करण्यात आलेला आहे. त्यापैकी १३,२७० मे.टन खतांची आतापर्यंत विक्री झाल्याने ३५,०६४ मे. टन साठा शिल्लक आहे. मंजूर आवंटनानुसार खतांचा पुरवठा होत नसल्याने काही खतांच्या साठ्यामध्ये कमी येत आहे. मात्र, यासाठी अन्य पर्यायी रासायनिक खत उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यात सद्यस्थितीत युरियाचा ७,९७१ मे. टन, डीएपी २,४८९ मे.टन, संयुक्त खते ६,१५० मे. टन, एसएसपी ८२२ मे. टन, अमोनियम सल्फेट ८२२ मे.टन, व मिश्र खतांचा २,६४४ मे. टन साठा सध्या शिल्लक आहे. पुढील आठवड्यात मान्सूनची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे एकाचवेळी पेरण्यांचे धुमशान सुरु होणार असल्याने डीएपी, एमओपी व अमोनियम सल्फेट खताचा नियोजित पुरवठा न झाल्यास तुटवड्याची शक्यता आहे.

७,०४,६७० क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध
सोयाबीनला मिळत असलेला उच्चांकी भाव व यंदा एमएसपीमध्ये ३५० रुपयांनी झाल्याने सोयाबीनच्या पेरणीक्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा ११,३२,१०० क्विटल बियाण्यांचे नियोजन कृषी विभागाद्वारा करण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत ७,०४,६७० क्विटल बियाणे उपलब्ध आहेत. बहुतेक शेतकऱ्यांद्वारा घरगुती बियाण्यांचा वापर पेरणीसाठी करण्यात येत असल्याने बियाण्यांचा तुटवडा राहणार नसल्याचे कृषी विभागाने सांगितले.
टोकन पद्धतीमुळे वाढेल सोयाबीनचा एकरी उतारा; जाणून घ्या कोणत्या पेरणी पद्धतीचे काय आहेत फायदे?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here