धक्कादायक: नराधम बापाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; कपड्याने गळा आवळून हत्या

rape
Photo: Internet

भिवंडी : बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना भिवंडी शहरात घडली. एका ३६ वर्षीय नराधम बापाने आपल्या अल्पवयीन मुलीची कपड्याने गळा आवळून हत्या करून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत. मृत मुलगी नराधम बापासोबत

भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. गुरुवारी दुपारच्या सुमारास नराधम बाप दारूच्या नशेत घरी आला. त्या वेळी घरात कोणी नसल्याचे पाहून त्याने मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला; परंतु मुलीने विरोध असता तिचा कपड्याच्या सहाय्याने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तो फरार झाला. या घटनेची माहिती भिवंडी शहर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. त्यानंतर नराधम बापावर पोक्सोसह अत्याचार तसेच हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला. त्याला भिवंडी शहरातूनच तीन तासांतच अटक करून बेड्या ठोकल्या. शुक्रवारी नराधम बापाला न्यायालयात हजर केले असता, ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास भिवंडी शहर पोलीस करत आहेत.
धक्कादायक: मुलगा होण्यासाठी पत्नीसोबत अनैसर्गिक संबंध