धक्कादायक: शाळेतील वॉचमनकडून दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार

child-rape
Photo: Google

लातूर : कोरोना महामारीनंतर आता शाळा उघडल्या असून चिमुरडी मुले मोठ्या आनंदाने शाळेला जावू लागली आहेत. परंतू, शाळेतीलच कर्मचाऱ्यांच्या वासनेला दोन मुली बळी पडल्या आहेत. चार दिवसांच्या अंतराने शहरातील एमआयडीसी आणि शिवाजीनगर पोलिसांच्या हद्दीमधील शाळांत हा किळसवाणा प्रकार समोर आला असून या दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये बाललैंगिक अत्याचारान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवाजीनगर पोलिसांच्या हद्दीत आंबाजोगाई रोडवर असलेल्या एका शाळेतील चपरासी ओंकार काळे याने पीडित मुलीस तुला सरांनी बोलावले असल्याचे सांगून ग्रंथालयाजवळ नेले आणि तुला वर्गात मॉनिटर बनवितो असे सांगत तिच्याशी अश्लिल चाळे केले. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिसांत गुरनं २८१/२२ कलम ३५४ (अ) (१), ५०६ भादंवि व कलम ८, १२ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेतील नराधम सेवकास अटक करण्यात आली आहे. या घटनेला चार दिवस उलटत नाहीत तोच, शहरातील एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीत असलेल्या एका शाळेतील दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचर केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या शाळेतील नराधम वॉचमन संजय गोविंदराव कोळी याने मंगळवारी सकाळी ११ ते १२ वाजेच्या सुमारास शाळेत खेळणाऱ्या ६ वर्षांच्या दोन मुलींना चॉकलेट आणि मोबाईल देण्याच्या बहाण्याने वॉशरुमकडे नेले आणि दोघीशिही अश्लिल कृत्य केली.

मुलींनी घरी आल्यानंतर घडला प्रकार आईला सांगितल्यानंतर आईच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसांत गुरनं ३६० / २२ कलम ३७६, ३७६ (३), ३७६ (२ जे), ३७६ (अब), ३५४(अ) (१) ३५४(ब) भादंवि सह कलम ४,६,८,१२ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सापोनि दिपाली गिते या करित असून आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याचे त्यांनी सांगितले.

अशा वेळी शाळा प्रशासन काय करते?
लातूर शहरातील चार दिवसांच्या फरकाने दोन शाळांत चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या दोन्ही शाळा नामांकित असून हे दोन्ही गुन्हे शाळा सुरू असताना घडले आहेत. गजबजलेल्या ठिकाणी शाळेतील वॉचमन, चपरासी असे किळसवाणे प्रकार घडत असतील तर शाळेतील शिक्षक, शाळा प्रशासन नेमके काय करतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चिमुरडी मुले शाळेत सुरक्षीत नसतील तर अशा घटनांमध्ये शाळेतील प्रमुखांनाही आरोपी करण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे.
विधवा बनली पोलीस शिपायाच्या वासनेची शिकार; लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार