Homeताज्या बातम्याशिष्यवृत्तीची रक्कम आता थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात!

शिष्यवृत्तीची रक्कम आता थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात!

औरंगाबाद : केंद्र आणि राज्य शासनाकडून मिळणारी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रक्कम आता महाविद्यालयांच्या नव्हे तर थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण विभागाने काढले असून, दोन टप्यात शिष्यवृत्तीची रक्कम मिळणार आहे. ही रक्कम मिळताच सात दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात पैसे जमा करण्याचे परिपत्रकात म्हटले आहे.

भारत सरकारच्या वतीने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमाना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती दिली जाते. आतापर्यंत निर्वाह भत्ता व परीक्षा फिसची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर आणि ट्युशन शुल्क व इतर शुल्काची रक्कम विद्यार्थी जेथे शिक्षण घेत आहेत, त्या महाविद्यालयाच्या खात्यावर जमा करण्यात येत होती. परंतु आता देय होणारी शिष्यवृत्तीची सर्व रक्कम लाभार्थी विद्यार्थ्याच्या आधार संलग्नित बँक खात्यात जमा होणार आहे. यात केंद्र सरकारची ६० टक्के आणि राज्य सरकारची ४० टक्के रक्कम आहे.

लाभ मिळण्यासाठी अर्ज भरल्यापासून ते रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची सर्व प्रक्रिया राज्याच्या महाडीबीटी पोर्टलमार्फत करणे अनिवार्य असेल. लाभाची रक्कम जमा केल्याबाबतची सूचना महाडीबीटी पोर्टलद्वारे प्रत्येक महाविद्यालयांना दिली जाईल, तोपर्यंत कोणत्याही अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम घेऊ नये, विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होणार नाही याची योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचना शैक्षणिक संस्थांना देण्यात आल्या आहेत.

दोन टप्प्यात मिळणार शिष्यवृत्ती
विद्यार्थ्यांना १ लाख शिष्यवृत्ती मिळत असल्यास यात केंद्र सरकार ६० हजार तर राज्य सरकार ४० हजार देणार आहे. केंद्र सरकार कडून मिळणाऱ्या ६० टक्के रक्कमेतून ५४ टक्के रक्कम अर्थात ५४ हजार रुपये महाविद्यालयात जमा करावी लागेल. उर्वरित ६ टक्के रक्कम विद्याथ्यांना ठेवता येईल. केंद्राप्रमाणेच राज्य सरकारकडून मिळणाऱ्या ४० टक्के रकमेतून ३६ टक्के अर्थात ३६ हजार रुपये महाविद्यालयांना तर उर्वरित ६ टक्के निर्वाहभत्ता आणि परीक्षा शुल्क रक्कम स्वतःकडे ठेवता येईल.

संस्थाचालक अशी घेणार भूमिका
मंजूर झालेली शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर शिल्लक राहिलेली व न भरलेली संस्थेची शिक्षण शुल्काची रक्कम विद्यार्थ्यांमार्फत संस्थेकडे ७ दिवसांच्या आत जमा करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी तसे न केल्यास पुढील वर्षीची शिष्यवृत्तीच्या नुतनीकरनाचे अर्ज महाविद्यालय, संस्था स्वीकारणार नाही. त्यानंतरचे प्रवेश घेतानाच विद्यार्थ्यांकडून संपूर्ण फिस जमा करून घेण्यात येईल.
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५० हजार जमा होणार, सोयाबीन व कापूस पिकांसाठी १ हजार कोटींचा निधी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Recent Post