Homeताज्या बातम्या४५ गुंठे जमिनीत कलिंगडाचे रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न! ७५ दिवसांमध्ये कमावले ३ राख...

४५ गुंठे जमिनीत कलिंगडाचे रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न! ७५ दिवसांमध्ये कमावले ३ राख रुपये

बीड जिल्ह्यातील कळंब गावात बालरोगतज्ज्ञ डॉ. रामकृष्ण लोंढे यांनी त्यांच्या मांगवडगाव शेतात कलिंगडाचे विक्रमी उत्पादन घेतले असून ४५ गुंठ्यांत, ७५ दिवसांत, तीन लाख तीन हजार रुपये किंमतीचे ४० टनापर्यंत उत्पादन घेऊन एक उच्चांक नोंदवला आहे.

डॉ. लोंढे यांनी सांगितले की, कलिंगडची लागवड साडेचार बाय सव्वा फूट अंतरावर, मल्चिंगचा पेपर व ठिबक वापरून केली. सुरुवातीला बेड मध्ये शेणखत, कोंबडी खत, मिश्र खते, थायमेट वापरले. पुरेशा ओलीवर दि १८ जानेवारीला बिया टोकण केल्या. आठ-दहा दिवसांनी उगवण झाली.

खाडे भरून घेतले. वेळोवेळी ड्रेचिंग, विद्राव्य खते, किटकनाशके, बुरशीनाशकाची फवारण्या घेण्यात आल्या. कलिंगडाच्या वाढीप्रमाणे नियमित पाणी दिले. एका रोपापासून तीन-चार फांद्या निघाल्या. एका फांदी वर दोन ते तीन फळे घेतली. ३२-३४ दिवसांनी फुलकळी येण्यास सुरुवात झाली. ४० दिवसांनी सेटिंगला सुरूवात झाली. सर्व फळे चांगली जोपासली. एक ही फळ वेडेवाकडे, किडके अथवा खोपडे निघाले नाही. मधमाशा मुबलक प्रमाणात होत्या.

प्लॉट पाहण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकरी व खरेददारांनी हजेरी लावली… दर्जेदार उत्पादन, चांगला भाव आणि रमजान मुळे कमी क्षेत्रावर कमी वेळेत भरघोस उत्पन्न हाती लागले. यामध्ये खर्चीक बाबी म्हणजे बियांणाचा किंमत, लागवड व फवारणी मजुरी, जंगली जनावरांच्या बंदोबस्तासाठी चौहो बाजूनी तारेचे कुंपण ई चा समावेश होतो. एकुण खर्च एक लाख रूपये आला. खर्च वजा जाता दोन लाख रुपये नफा झाला. पुढील वर्षी बियांपासून रोपे बनवून लागवड करणार आहे.

त्यामुळे फवारणी व लागवड मजुरी कमी होण्यास मदत होईल. कलिंगडाचे वेल काढून त्याच बेड वर पत्ता कोबी आणि हिरव्या मिरचीची दि ६ मे २२ रोजी लागवड केली आहे. यासाठी प्रगतीशील शेतकरी बभ्रुवाहन कणसे, नारायण भिसे, बवन ईटकर, बाळू गुंठाळ. तसेच महावीर कृषी केंद्राचे सुनील कर्नावट, शफीक बागवान, लियाकत बागवान यांचे बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले असे डॉ. रामकृष्ण लोंढे यांनी सांगितले.

६ व ९ एप्रिलला तोडणी केली. प्रथम श्रेणीचा माल ३० टन निघाला. त्याला ९ रु ५० पैसे प्रति किलो दर मिळाला. द्वितीय श्रेणीचा माल १० टन निघाला. त्याला ५ रु. प्रतिकिलो दर मिळाला कमिशन न घेता व्यापाऱ्याने शेतात जागेवर खरेदी करून इतर शहरात माल पाठविला. या हंगामात एका कलिंगडांचे जास्तीत जास्त १० किलो ६५ ग्रॅम वजन मिळाले.
पशुधनाच्या चाऱ्यालाही महागाईची झळ! कडबा, सोयाबीन कुटाराचे भाव वधारले

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Recent Post