२०० फूट ओढत नेत विद्यार्थिनीचा चिरला गळा; एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयाजवळ थरार

crime
Photo: Social media

औरंगाबाद : एकाच कॉलनीत राहणाऱ्या कॉलेजमधील विद्यार्थिनीवर त्याचे प्रेम जडले. पण तिने त्यास स्पष्टपणे नकार दिला. पण एकतर्फी प्रेमातून तो धुमसतच राहिला. तिच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने टोकाचा निर्णय घेत त्याने तिला आयुष्यातून उठवले.

शनिवारी दुपारी ती नेहमीप्रमाणे कॉलेजला निघाली. त्याने वाटेतच अडूवन तिच्याशी वाद घातला. तरीही ती बघत नसल्याने तिला कॉलेज परिसरातून २०० फूट ओढत नेत, धारदार शस्त्राने अत्यंत निर्दयीपणे तिचा गळा चिरला. शहरातील प्रतिष्ठित अशा देवगिरी महाविद्यालय परिसरात घडलेल्या या थरारक घटनेने औरंगाबादसह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. घटनेनंतर युवतीला रक्ताच्या थारोळ्यात टाकून आरोपी फरार झाला असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके रवाना झाली आहेत. सुखप्रीत कौर ऊर्फ कशीश प्रीतपालसिंग ग्रंथी असे मृत विद्यार्थिनीचे, तर शरणसिंग शेठ्ठी असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुखप्रीत कौर ऊर्फ कशीश प्रीतपालसिंग ग्रंथी ही देवगिरी महाविद्यालयात बीबीएच्या प्रथम वर्षाला होता. नेहमीप्रमाणे सकाळी ११ वाजता कॉलेजला जाते म्हणून घराबाहेर पडली. मात्र, शरणसिंग तिचा पाठलाग करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता; परंतु सुखप्रीत त्याला टाळत होती. दुपारी रचनाकार कॉलनीतील एका कॅफेमध्ये शरणसिंग याने सुखप्रीतला गाठले. त्या ठिकाणी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला.

वादानंतर शरणसिंग दुपारी १ वाजून ३७ मिनिटांनी तिला ओढत २०० फुटांवरील रचनाकार कॉलनीत घेऊन गेला. तेथे एका रिकाम्या प्लॉटमध्ये त्याने स्वतःजवळील चाकू काढून सुखप्रीतच्या मानेवर उजव्या बाजूने वार केला. त्यानंतर तेथून शरणसिंगने पळ काढला. सोबतच्या मुलीने घटनास्थळाकडे धाव घेतली असता, सुखप्रीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. मुलीने आरडाओरडा करून मदत मागितली. त्या भागातील तरुणांनी तत्काळ १०८ ला फोन करून अॅम्बुलन्स मागविली. तिला तातडीने क्रांतीचौक भागातील खासगी रुग्णालयात दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच वेदांतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप आणि इतर कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले. सुखप्रीतची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला घाटीत हलवण्यात आले; परंतु काही वेळातच तिचा मृत्यू झाला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळावरून सॅम्पल हस्तगत केले.
प्रेमात अडसर ठरत असल्याने आईला मारण्यासाठी तीन दिवसांपूर्वीच रचला ‘प्लॅन’; मुलीने आईला शेतात बोलावून केला घात