Homeताज्या बातम्याउच्च शिक्षणानंतर शेतीला दिले प्राधान्य! प्रशांत पटवर्धन यांचे शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग

उच्च शिक्षणानंतर शेतीला दिले प्राधान्य! प्रशांत पटवर्धन यांचे शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग

रत्नागिरी : मुंबईत केंद्रीय अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेत पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करताच मित्रांनी नोकरीसाठी परदेशाची वाट धरली; परंतु जानशी (राजापूर) येथील प्रशांत रामचंद्र पटवर्धन यांनी नोकरीच्या मागे न लागता, वडिलोपार्जित शेती करण्याचा निर्णय घेतला. गेली २२ वर्षे ते शेतीमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग करीत उत्पन्न घेत आहेत.

गावातील लाल मातीतही सोनं पिकविता येऊ शकतं हे बोलायला सोपे असले तरी कष्ट मात्र भरपूर आहेत. वर्गमित्र परदेशात नोकरी करून रग्गड पैसा कमवत असताना प्रशांत यांनी केवळ आजीच्या सांगण्यावरून गावाकडील शेती करण्याचा निर्णय घेतला. वडिलोपार्जित काही लागवड होती. मात्र, नंतर टप्प्याटप्प्याने लागवड वाढवत नेली. आंबा, काजू, नारळ, सुपारी, तसेच नारळ व सुपारी बागेत लवंग, जायफळ, काळीमिरी लागवड करून उत्पन्न घेत आहेत.

कातळावरील साडेपाच एकर जमिनीतही त्यांनी आंबा लागवड केली आहे. आंबा लावताना त्यांनी केवळ हापूस लागवड केलेली नाही, तर त्यामध्ये पायरी, आम्रपाली, रायवळ, केशर, एनी टाईम (एटीएम) या प्रकारच्या आंब्यांची लागवड केली आहे. विद्यापीठाच्या शिफारशीनुसार हापूसच्या बागेत मिश्र आंबा लागवड केल्यास मोहर चांगला येऊन फळधारणाही चांगली होते. प्रत्येक दहा हापूस लागवडीमागे एक वेगळ्या प्रकारच्या आंब्याचे झाड लावले आहे. एटीएम या प्रकारच्या आंब्याचे वैशिष्ट्य म्हणजे चवीला रायवळसारखा व वर्षातून दोन वेळा उत्पन्न देणारा आंबा आहे. त्यामुळे एटीएमची लागवड त्यांनी काही प्रमाणात केली आहे.

लाखी बाग

नारळ बागेत मसाला, केळी, अननस, तसेच अन्य पिकांची लागवड केली, तर सर्वापासून लाखोचे उत्पन्न वर्षाला प्राप्त होते. त्यासाठी त्यांनी नारळी, सुपारी बागेत मसाला पिकांची लागवड केली असून, साधारणत: दरवर्षी दोनशे किलो काळीमिरीचे उत्पन्न प्राप्त होत आहे.

भाजीपाला पिके

कातळावरील आंबा बागेत १० गुंठे क्षेत्रावर माती टाकून भाजीचा मळा तयार केला आहे. तण येऊ नये यासाठी मल्चिंग पेपर टाकून सरी पद्धतीने लागवड केली आहे. कोबी, पालक, मुळा, गाजर, फ्लॉवर, कलिंगड, पावसाळ्यात चिबूड, काकडी, दोडके, पडवळ, लाल भोपळा, दुधी भोपळा यासारखे उत्पादन घेत आहेत. १५० काजूची लागवड असून, बी विक्री करीत आहेत. आंबा मात्र मुंबई, पुणे मार्केट, खासगी विक्री करीत आहेत.

साल वाळविणे

दालचिनीची ओली साल सावलीत वाळवावी, व साल काढलेल्या फांद्या उन्हात वाळवाव्यात. ज्या फांद्यांवरून साल काढलेली असते, त्याच फांद्यानंतरची साल बांधण्यास वापरावी. पहिल्या दिवशी साल बांधणीसाठी फांद्या उपलब्ध होणार नाहीत, म्हणून घरी असलेल्या काळ्या (वाळलेल्या) अगर पाईप घेऊन त्यावर साल बांधावी. त्यामुळे साल मिटत नाही व त्याची प्रत खराब होत नाही. साल वाळविताना विशिष्ट तंत्राचा अवलंब करणे फायदेशीर आहे.

बुरशीपासून संरक्षण

साल अशीच वाळवली तर तिची गुंडाळी होते व आतील भाग वाळत नाही व त्याठिकाणी बुरशी येवून प्रत खराब होते. साल चडवलेल्या काठ्या सावलीत उभ्या करून ठेवाव्यात. पाच ते सहा दिवसानंतर काठ्यांवरून साल काढून सावलीत ठेवावी. त्यानंतर उन्हामध्ये १० ते १५ मिनिटे वाळविल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवावी. साल काढणे वाळविण्यासाठी विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे. चौथ्या वर्षांनंतर दालचिनीचे झाडापासून उत्पादन सुरु होते.

उत्पादन

लागवडीनंतर तिसऱ्या वर्षी ३५ ते ५० ग्रॅम वाळलेली साल मिळते. पाचव्या वर्षापासून पुढे उत्पादनात वाढ होते. दहाव्या वर्षापासून प्रति झाड २०० ते २५० ग्रॅम वाळलेली साल मिळते. लागडीपासून सरासरी ६० ते ६५ वर्षे उत्पादन घेता येते. दालचिनीच्या पानांचा उपयोग तमालपत्रासारखा करता येतो, किंवा या पानांपासून तेल काढता येते. लवंगाच्या तेलासारखा उपयोग होतो.

दालचिनीच्या तेलामध्ये युजेनॉल हा घटक असतो. दीड ते दोन किलो वाळलेल्या पानांचे उत्पन्न मिळते. दालचिनी तोडण्यापूर्वी जी फळे येतात तरी काढून उन्हात वाळवावी त्याचा उपयोग काळा नागकेशर म्हणून मसाल्यामध्ये केला जातो. दालचिनी झाडापासून १० ते १२ टन लाकूड प्रति हेक्टर मिळते. एकूणच योग्य तंत्राच्या वापरामुळे चांगले उत्पन्न प्राप्त होत आहे.
अतिरिक्त उसाने घेतला शेतकऱ्याचा बळी! दोन एकर उसाला काडी लावून कवटाळले मरण

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Recent Post