कोल्हापूर : राज्य सरकारने पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची पात्र शेतकऱ्यांची माहिती येत्या बुधवारपर्यंत सहकार विभागाकडे सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी देण्यात आले आहेत.
प्रोत्साहनपर अनुदान योजनेचे काम कुठंपर्यंत आले, पुढील प्रक्रिया कशा पद्धतीने राबवायची, याबाबत बुधवारी सहकार आयुक्त अनिल कवडे हे राज्यातील विभागीय सहनिबंधक व जिल्हा उपनिबंधकांकडून आढावा घेणार आहेत.
अद्याप या योजनेबाबत स्पष्टता आलेली नाही; परंतु संगणक प्रणालीद्वारे माहिती भरणे, पात्र यादी आणि त्यानंतर आधार प्रमाणीकरण होऊन शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडण्यासाठी ऑगस्ट उजाडण्याची शक्यता आहे.
या खातेदारांना मिळणार लाभ
ज्या शेतकऱ्यांनी २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० यापैकी दोन किंवा एक वर्ष पीक कर्जाची परतफेड विहीत कालावधीत केली आहे. त्यांना लाभ मिळणार आहे. या तीन वर्षार्षिकी एक वर्ष जरी थकीत असेल तर अपात्र ठरणार.
बँकांना ही माहिती भरावी लागणार
नाव, जन्मतारीख, आधार क्रमांक, बैंक शाखा, खाते क्रमांक, कर्जाची उचल, परतफेडीचा कालावधी, मुद्दल व व्याजाची आकारणी, शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला का?, महात्मा फुले कर्जमुक्तीचा लाभ मिळाला का?
भारतीय मक्याला सुवर्णकाळ; अमेरिकेपेक्षा स्वस्ताई, ऑगस्टपासून तीन महिने चणचण शक्य