Homeआरोग्यकरोनाची लस घेणारे लोक दोन वर्षात मरणार? जाणून घ्या सत्य

करोनाची लस घेणारे लोक दोन वर्षात मरणार? जाणून घ्या सत्य

करोनाची महामारी रोखण्यासाठी सिरम ने बनवलेली लस घेण्यासाठी लोकांची धडपड सुरू असताना नोबेल पुरस्कार विजेते विषाणु तज्ञ लुक मॉन्टीजीनीयर यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. जे लोक कोरोना लस घेतील ते दोन वर्षात मरणे निश्चित आहे असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केल्याचे वृत्त आल्याने वैक्सीन घेतलेल्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पण याची सत्यता आपल्या टीमने पडताळणी असता ही न्यूज फेक आहे त्यांनी कुठलेही असे वक्तव्य केलेले नाही. लोकांनी ही बातमी वाचली असेल तर काळजी करण्याची गरज नाही. 

काय होती लस बद्दल फेक बातमी वाचा सविस्तर : 

जागतिक महामारी संपूर्ण जगात सुरू असताना लोकांचा कोरोना पासून बचाव करण्यासाठी शासनाने सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर्स, शासकीय अधिकारी, पत्रकार यांना वैक्सीन द्यायला लावून यानंतर सर्वसामान्यांसाठी ही वैक्सीन उपलब्ध केली. यामुळे ही वैक्सीन घेण्यासाठी लोकं वैक्सीन केंद्रावर गर्दी करत आहे.

यादरम्यान काहींना ही लस लवकर न उपलब्ध झाल्याने त्यांनी वैक्सीन केंद्रावर वशिलेबाजी सुद्धा सुरू केली आहे. मात्र नोबेल पुरस्कार विजेते आणि विषाणु तज्ञ लुक मॉन्टीजीनीयर यांनी केलेल्या खळबळजनक वक्तव्यामुळे लस घेतलेल्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. तर वैक्सीन न घेतलेले लोक ‘आपण यातून वाचलो बुवा’ असे म्हणताना दिसत आहे. 

लोकांना चकित करणारी ही बातमी सांगताना नोबेल पुरस्कार विजेते व विषाणु तज्ञ लुक मॉन्टीजीनीयर म्हणतात की, लस मध्ये मिसळलेल्या काही घटकांची पडताळणी केल्यानंतर ज्यांनी-ज्यांनी ही लस घेतली आहे ते सर्व लोक प्रतिजैविकावर अवलंबून राहतील. त्यामुळे वैक्सीनेशन ची हि सगळ्यात मोठी चूक आहे. ही जीवशास्त्र व आरोग्याशी संबंधित एक जगातली सगळ्यात मोठी चूक ठरू शकते. 

मुलगा कमजोर, तरी हवा वंशाला दिवा! सासुनेच दिली सुनेला परपुरूषाची दवा !

लुक मॉन्टीजीनीयर यांनी केलेले संशोधन हे अमेरिकेतील RAIR फाऊंडेशनला दिले आहे. हा कोविड व्हायरस आहे तो प्रत्येक वेळी त्याचे नवीन-नवीन रूप बदलत असतो. त्यामुळे ज्या लोकांनी कोरोनाची वैक्सीन घेतली आहे त्यांच्या जगण्याची कसलीही आशा नाही. म्हणूनच लस घेतलेल्या लोकांना जाळण्यासाठी आपण तयार राहिले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

त्यांच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली असून आता या वैक्सीनकडे लोक पाठ फिरवत आहे. तर ज्यांनी ही वैक्सीन घेतली आहे त्या लोकांची झोप उडालेली दिसून येत आहे. 

असा उल्लेख या फेक बातमीत केला होता. यापुढे आपण कुठली बातमी वाचत असताना त्याची सत्यता एक वेळा जरूर पडताळून बघा. वैक्सीन पूर्णपणे सुरक्षित आहे. करोना महामारीपासून बचाव करायचा असेल तर लस घेतलीच पाहिजे.

मुलगा होत नसल्याने नवर्‍याने मांत्रिकाकडे सोपवली बायको, महिलेला नग्न करून लावली राख

RELATED ARTICLES
- Advertisment -

Recent Post