दुबई : भारत आणि पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा ट्वेण्टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने आमने-सामने येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या काळात रंगणान्या ट्वेण्टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार क्रिकेट विश्वातील दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये भिडतील.
प्राथमिक वेळापत्रकानुसार ऑस्ट्रेलियातील ट्वेण्टी-२० विश्वचषक स्पर्धा २०२० मध्ये आयोजित करण्यात आली होती; पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षांसाठी स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. संयुक्त अरब आमिरातीमध्ये पार पडलेल्या विश्वचषकातील स्वरूपाची पुन्हा एकदा आयसीसीने पुनरावृत्ती केली आहे. त्यानुसार प्राथमिक फेरी, मुख्य फेरी (सुपर १२) आणि त्यानंतर बाद फेरी असे सामने खेळवण्यात येतील. प्राथमिक फेरीनंतर सुपर १२ मधील पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरोधात २२ ऑक्टोबर रोजी निश्चित करण्यात आला आहे. एकदिवसीय आणि ट्वेण्टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय संघाला संयुक्त अरब अमिरातीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवाचा वचपा काढण्याची संधी भारताकडे चालून आली आहे. प्राथमिक फेरीतील दोन गटांतील पहिल्या दोन संघांना मुख्य फेरीचे द्वार खुले होईल.
श्रीलंका आणि दोन वेळचे एकदिवसीय विश्वचषकाचे विजेता आणि दोन वेळा ट्वेण्टी-२० विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या वेस्ट इंडीजला प्राथमिक फेरीतून मार्गक्रमण करावे लागेल. श्रीलंका संघावर ही अशीच परिस्थिती ओढावली आहे. एकूण सोळा संघ विश्वचषकात सहभागी होणार असून सर्व सामने अॅडलेड, ब्रिस्बेन, गीलाँग, होबार्ट, प आणि सिडनी येथे खेळले जातील.
प्राथमिक फेरी:
- गट अ- श्रीलंका, नामिबिया, पात्रता फेऱ्यातील दोन संघ
- गट ब- वेस्ट इंडीज, स्कॉटलंड, पात्रता फेऱ्यातील दोन संघ
भारतीय संघाचे सामने –
- २३ ऑक्टोबर – भारत वि. पाकिस्तान, मेलर्बन, दुपारी १.३० वा.
- २७ ऑक्टोबर- भारत वि. अ गटातील उपविजेता, सिडनी, दुपारी १२.३० वा.
- ३० ऑक्टोबर- भारत वि. दक्षिण आफ्रिका, पर्थ दुपारी ४.३० वा.,
- २ नोव्हेंबर- भारत वि. बांगलादेश, अॅडलेड, दुपारी १.३० वा.
- ६ नोव्हेंबर- भारत वि. ब गटातील विजेता, मेलबर्न, दुपारी १.३० वा.
मुख्य फेरीतील संघ –
- गट १ : इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान,
- गट ‘अ’ मधील विजेता, गट ‘ब’चा उपविजेता
- गट २ : भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश,
- गट ‘ब’ चा विजेता, गट ‘अ’ मधील उपविजेता