नवी दिल्ली : कोरोना महामारीचे संकट ओसरत असल्याच्या दिलासादायक वातावरणात सरकारने बालकांसाठी दोन लसींना मंजुरी दिली आहे. ५ ते १२ वयोगटातील बालकांसाठी कोरोना प्रतिबंधक ‘कॉर्बेव्हॅक्स’ आणि ६ ते १२ वयोगटातील बालकांसाठी ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय १२ वर्षांपुढील मुलांसाठी ‘झायकोव्ह डी’ लसीचा प्रत्येकी ३ मिलीग्रॅम अतिरिक्त डोस देण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. सध्या या लसीच्या प्रत्येकी दोन मिलीग्रॅमचे तीन डोस देण्यात येतात.
औषध महानियंत्रक अर्थात डीसीजीआयने बालकांसाठी दोन लसींना परवानगी दिली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी दिली. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेच्या (सीडीएससीओ) कोरोना महामारीसंदर्भातील विशेषज्ज्ञांच्या समितीने (एसईसी) केलेल्या शिफारशीनंतर डीसीजीआयने लसींना मंजुरी दिली आहे.
एसईसीने ५ ते १२ वर्षे वयोगटातील बालकांसाठी बायोलॉजिकल ई कंपनीच्या ‘कोर्बेव्हॅक्स’ आणि ६ ते १२ वयोगटातील बालकांसाठी ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुर देण्यासाठी गत आठवड्यात शिफारस केली होती. सद्यस्थितीत ही लस १२ ते १४ वयोगटातील बालकांना दिली जात आहे. तर २४ डिसेंबर २०२६ पासून १२ ते १८ वयोगटातील लोकांसाठी कोव्हॅक्सिनला आपत्कालीन वापराची परवानगी देण्यात आली होती. उल्लेखनीय म्हणजे सरकार १६ मार्चपासून १२ ते १४ वयोगटातील बालकांसाठी लसीकरणाचं मोहीम सुरू केली होती. तर देशभरात लसीकरण अभियानाला १६ जानेवारी २०२१ पासून सुरुवात झाली होती.
– काय सांगता! गाय, म्हैस पाळण्यासाठी देखील मिळते क्रेडिट कार्ड, असा करा अर्ज