आता ‘पोटॅश’चे दर भिडले गगनाला, शेतकरी आर्थिक संकटात

potash
photo: google

नाशिक: पिकाच्या जोमदार वाढीसाठी वापरल्या जाणाऱ्या पोटॅशचे दर प्रति बॅग 700 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे तीन महिन्यात पोटॅशचे दर एक हजार रुपये वरून सतराशे रुपयावर पोहोचले आहेत. दरवाढीमुळे मिश्रखतांच्या किमतीही 100 ते 250 रुपयांनी वाढल्या आहेत. डीएपी खताचे दरही शंभर रुपयांनी महागले आहेत.

पेट्रोल व डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे शेती मशागतीचा खर्च वाढला असून त्यातच आता खरिपाच्या तोंडावर रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे डोळे पांढरे झाले आहेत. सर्वत्र शेतकऱ्यांची मशागतीची कामे जोमात सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र, खतांचे वाढलेल्या भरमसाठ दरामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणींचा डोंगर उभा ठाकला आहे.

शेती हा मुख्य व्यवसाय असून त्यात राबणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहेअनेकांचे कुटुंब शेतीच्या उत्पादनावर अवलंबून असून चांगले पीक शेतात यासाठी यावे, शेतकऱ्याकडून दिवस-रात्र शेतामध्ये राबल्या जाते. सध्या बी बियाणे व खतासाठी शेतकऱ्यांकडून पैशांची जुळवाजुळव करावी लागत आहे.

महागडे खत, बियाणे घेण्यासाठी विविध प्रकारे बळीराजकडून पैशांची जुळवाजुळव सुरू असल्याचे दिसून येत आहे. प्रामुख्याने पिकांची चांगली वाढ, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पोटॅशचे दर गगनाला भिडले आहेत. भारतात पोटॅशचा पुरवठा असलेल्या रशिया व युक्रेनमुळे यांच्या युद्धामुळे 50 किलोच्या बॅगचे दर गेल्या तीन महिन्यात 700 रुपयाने महागले आहे. पूर्वी एक हजार रुपयाला मिळणारी बॅग आता 1700 रुपयात मिळत आहे.

खतांचा वापर जपूनच करा

शेतकरी जमिनीचे आरोग्य न तपासताच रासायनिक खतांचा वारेमाप वापर करतात. त्यात अनावश्यक खतेदेखील टाकली जातात. रासायनिक खतांचे दर वाढल्याने शिफारशीनुसारच खते देण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसतो. त्यामुळे उत्पादन खर्च तर, वाचेल पण अनावश्यक खतामुळे जमिनीचे आरोग्य बिघडणे थांबेल, अशी माहिती कृषी विभागाकडून दिली जात आहे. शेतकऱ्यांनी खतांचा वापर जपून करणे गरजेचे आहे.
हळद रुसलेलीच, भावात पुन्हा घसरण, ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here