Homeताज्या बातम्यावीज पडण्याच्या १५ मिनिट अगोदर मोबाईलवर सूचना! या ॲपचा करा वापर

वीज पडण्याच्या १५ मिनिट अगोदर मोबाईलवर सूचना! या ॲपचा करा वापर

यवतमाळ : मान्सून कालावधीत वीज पडून मोठ्या प्रमाणात जीवित हानी होते. हे टाळण्यासाठी भारतीय मौसम विभागाने तयार केलेले दामिनी अॅप सर्वांनी वापरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. या अॅपमध्ये जेथे वीज पडणार आहे, त्या भागाची स्थलदर्शक माहिती वीज पडण्याच्या १५ मिनिट अगोदर दर्शविण्यात येते. या माहितीमुळे संबंधित भागातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांच्या मोबाईलवर पूर्वसूचना देऊन खबरदारी घेता येईल आणि जीवित हानी टाळता येईल, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गुरुवारी मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला. बैठकीला सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता मनीष राजभोज, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, जिल्हा साथरोग अधिकारी तनवीर शेख, मुख्याधिकारी माधुरी मडावी आदींसह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पूरप्रवण गावाची ओळख करणे, मुख्य नदीच्या प्रवाहातील अडथळे काढणे, नैसर्गिक जलाशयाची साफसफाई करणे, त्यातील गाळ काढणे, जिल्ह्यातील सर्व धरणे १०० टक्के सुरक्षित असल्याचा अहवाल सादर करण्याबाबत सूचना दिल्या.

अतिसंवेदनशील गावात राबविणार उपाययोजना

पुराच्या पाण्यामुळे ज्या गावात संपर्क तुटतो, अशा अतिसंवेद नशील गावांची यादी तयार करून तेथे आवश्यक उपाय योजना करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. विद्युत खांब दुरुस्ती करून घेणे, रस्त्यांची डागडुजी पूर्ण करणे, नदी व नाल्या काठचे अतिक्रमण हटविणे, पावसाच्या पाण्याचा निचरा होईल यासाठी व्यवस्था करणे तसेच नगर परिषद क्षेत्रात नाले सफाई करून घेण्याचे निर्देशही देण्यात आले.
पीक कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना १००% व्याज परतावा

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Recent Post