4 राज्यांतून नवा कांदा दाखल: पाकिस्तानचा कांदा खराब, निर्यातीमध्ये वाढ होण्याचे चिन्हे, येत्या काळात दर वाढण्याची शक्यता

Onion

नाशिक : नाफेडने खरेदी केलेला कांदा (Onion purchased by Nafed) अचानक बाहेर आणला, साठविलेल्या उन्हाळ कांद्याची (stored summer onions) खरी आकडेवारी न समजल्याने तसेच नवीन (लाल) कांदा (New red onion) हा महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये लवकर बाजारात दाखल झाल्याने दरात घसरण सुरू झाली. त्यामुळे कांदा उत्पादकांसह (Onion growers) व्यापाऱ्यांनाही आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. शनिवारी नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समितींमध्ये नवीन कांद्याला (लाल) १५०० ते ३२०० रुपये तर जुन्या (उन्हाळ) ८०० ते १७०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. तसेच परदेशातही नवीन कांद्याला मागणी वाढल्याने निर्यातीमध्ये वाढ होण्याचे चिन्हे आहे.

मुबलक झालेला पाऊस, कमी झालेली पाणीटंचाई यामुळे कांदा लागवडीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यंदा शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात साठवणूक केली होती, तर व्यापाऱ्यांकडे देखील कांदा साठवण अधिक असल्याने बाजारात वेळोवेळी कांदा उपलब्ध होत गेला. तसेच नाफेडने खरेदी करून ठेवलेला कांदा खराब झाला असला तरी विक्री केला. त्यामुळे कांदाटंचाई जाणवली नसल्याने दरवाढीवर परिणाम झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन चुकले तर ग्राहकांना लाल कांदा बाजारात दाखल होईपर्यंत आवाक्यातील दरात कांदा मिळत गेल्याने त्यांच्यामध्ये समाधान राहिले.

पाकिस्तानचा कांदा खराब, बाजारात नसल्याने भारतीय कांद्यास मागणी
पाकिस्तानमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथील कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानातून निर्यात होणारा कांदा मुबलक प्रमाणात नसल्याने इंडोनेशिया, दुबई, थायलंड, मलेशिया, श्रीलंका या देशांतून भारताच्या लाल कांद्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे कांदा निर्यातीसाठी समाधानकारक वातावरण रहाणार आहे.

दर स्थिर राहण्याची शक्यता
नवीन कांदा हा लवकर बाजारात दाखल झाला आहे, त्यामुळे जुन्या कांद्याची मागणी कमी झाली आहे. ग्राहकांकडून नवीन कांद्याला मागणी असते. परिणामी जुन्या कांदा दरात घसरण झाली असुन सध्या दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. विकास सिंग, कांदा निर्यातदार

नाशिक जिल्ह्यातील कांद्याची मागणी घटली
राज्यातून कांदा पश्चिम बंगाल, बिहारमध्ये विक्रीला जात असतो. तर सध्या मध्य प्रदेशातील कांदा हा दिल्ली, हरियाणा, पंजाब या परिसरात जात असल्याने नाशिकच्या कांद्याची मागणी कमी झाली आहे.
-इम्तियाज पटेल, कांदा व्यापारी

कालचे कांदा बाजारभाव –

कोल्हापूरक्विंटल390670022001400
औरंगाबादक्विंटल17462001200700
जुन्नर – नारायणगावचिंचवडक्विंटल6030018001400
सोलापूरलालक्विंटल2596310026501200
धुळेलालक्विंटल408020020001600
लासलगावलालक्विंटल98125018001616
पंढरपूरलालक्विंटल28410019001400
नागपूरलालक्विंटल180100020001750
साक्रीलालक्विंटल6505001250900
भुसावळलालक्विंटल19100010001000
अमरावती लोकलक्विंटल468150030002250
सांगली लोकलक्विंटल385950022001350
पुणे- खडकीलोकलक्विंटल9100016001300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल13100014001200
पुणे-मोशीलोकलक्विंटल2663001200750
जामखेडलोकलक्विंटल16210030001550
वाईलोकलक्विंटल15100020001500
शेवगावनं. १नग2530120015001200
शेवगावनं. २नग190080010001000
शेवगावनं. ३नग1000100700700
नागपूरपांढराक्विंटल100100020001750
नाशिकपोळक्विंटल94100019001650
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल222030032452400
येवलाउन्हाळीक्विंटल35002001370750
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल15001501099800
नाशिकउन्हाळीक्विंटल136145014551255
लासलगावउन्हाळीक्विंटल379550015911100
लासलगाव – विंचूरउन्हाळीक्विंटल998050013851050
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल95941001800900
चांदवडउन्हाळीक्विंटल32003811270750
मनमाडउन्हाळीक्विंटल20004001021700
कोपरगावउन्हाळीक्विंटल806030017991100
कोपरगावउन्हाळीक्विंटल24202251250850
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल716520017251150
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळीक्विंटल19805001115700
वैजापूरउन्हाळीक्विंटल6141501200900

हे पण वाचा : भाव घसरले: सोयाबीन, कापसाची आवक घटली; शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा…