Monsoon Update: मुसळधार पावसाची शक्यता; 4 दिवस धोक्याचेच, खरिपावर टांगती तलवार..!

rain
फोटो: सोशल मिडिया

मुंबई : मुंबई शहरासह उपनगरात शनिवारी सकाळसह दुपारी तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली असतानाच दुसरीकडे भारतीय हवामान शास्त्र विभागाने राज्याला येत्या तीन दिवसांसाठी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

विदर्भातदेखील मोठा पाऊस अपेक्षित असून, काही भागात गडगडाटसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

राज्यात एक जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २८ जिल्हे व २९९ गावे प्रभावित झाली आहे. ८३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली असून, १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११० नागरिकांना आपला जीव गमावला आहे, तर २१८ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णतः तर २ हजार ०८६ घरांचे अशंतः नुकसान झाले आहे.

आता पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून मुंबई २, पालघर १, रायगड २, ठाणे २, रत्नागिरी आणि चिपळूण २, कोल्हापूर २, सातारा १, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या एकूण १२ तुकड्या तैनात आहेत. नांदेड १, गडचिरोली १ अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात आहेत.

यलो अलर्ट

२४ जुलै : पालघर, नाशिक, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया
२५ जुलै : अकोला
शंखी गोगलगायींचा उपद्व्याप वाढला; कृषी विभागाने सुचविल्या उपाययोजना