माझ्या सोबत लग्न कर, म्हणत गावगुंडाचा तरूणीवर जबरदस्तीने विष प्रयोग

suicide poison
Photo: Social media

गेवराई : ‘माझ्यासोबत लग्न कर’ म्हणत एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला, गावातीलच गावगुंड तरुणाने जबरदस्ती विष पाजले. यावेळी कुटुंबातील व्यक्तींनी वेळीच सतर्कता दाखवत, त्या गावगुंड तरुणाच्या तावडीतून मुलीची सोडवणूक केली. व जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. सध्या पीडितेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक आणि संतापजनक घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील काजळवाडीमध्ये मंगळवारी रात्री आठच्या दरम्यान घडली आहे.

नुकतीच इयत्ता दहावीची परीक्षा देणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी, आपले आई वडील ऊसतोडणीसाठी कारखान्याला गेल्यानंतर, चुलत्याकडे राहत होती. हीच संधी साधून गावातील गाव गुंड असणाऱ्या एका २५ वर्षीय तुकाराम नावाचा तरुण तिची छेड काढत असे. ‘गेल्या दोन वर्षांपासून तो सतत तो छेड काढतोय, माझ्यासोबत लग्न कर, असं म्हणत सतत धमक्या देतोय’ शाळेत जाताना अडविणे अशा गोष्टी यापूर्वी देखील घडल्याचे कुटुंबाने सांगितेले.

मात्र, मंगळवारी रात्री हद्दच पार केली. शेतातच राहणाऱ्या पीडितेच्या घरी तो गेला, ‘माझ्यासोबत लग्न कर असे म्हणत त्याने थेट विष पाजलं. या दरम्यान कुटुंबातील व्यक्तींनी वेळीच सतर्कता दाखवली आणि त्या गुंडांच्या तावडीतून आपल्या मुलीला सोडविले. आणि जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. सध्या तिच्यावर जिल्हा रुग्णालयातील आयसीयू वार्डात उपचार सुरू आहेत. दरम्यान तलवाडा पोलिसांकडून पीडितेचा जबाब नोंदविण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

तर या विषयी पीडित अल्पवयीन मुलगी म्हणाली, की तो सतत शाळेत जाता येताना मला त्रास देत होता. माझ्यासोबत लग्न कर म्हणून धमकी टाकत होता, रस्त्यात अडवित होता. तर याविषयी पीडितेचे वडील म्हणाले, की मी ऊसतोड कामगार आहे. माझ्या मुलीला गावातील तुकाराम सतत छेडत होता. माझ्यासोबत लग्न कर म्हणून धमकी देत होता. मी ऊस तोडायला गेल्या नंतर त्याने मुलीला खूप त्रास दिला.

तर पीडितेचे चुलते म्हणाले, की गेल्या दोन वर्षांपासून तो त्रास देतोय. मात्र गावातील असल्यामुळे आम्ही त्याला समजावून सांगितलं, आम्हाला तो ऐकल असं वाटलं, मात्र तो सतत मुलीला अडवून त्रास द्यायचा. माझा भाऊ ऊसतोड कामगार आहे.

तो कारखान्याला गेल्यावर देखील त्याने अनेक वेळा तिची छेड काढली. काल त्याने घरी जाऊन विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता आम्हाला मुलगी हुशार असून देखील तिला पुढील शिक्षण शिकू द्यावे की नाही ? असा प्रश्न पडला आहे. सदरील घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
बाहुलीला फाशी देऊन चिमुकल्याने घेतला गळफास! हॉरर व्हिडीओ पाहून आठ वर्षीय मुलाचे कृत्य