खरिपाच्या तोंडावर ‘महाबीज’चा मोठा निर्णय! सोयाबीन बियाणांच्या किंमतीमध्ये दुपटीने वाढ

soyabean
photo: marathi paper

अकोला : यंदाच्या खरीप हंगामासाठी सर्व काही वेळेवर होत असले तरी शेतकऱ्यांना महागाईचा सामना करावा लागणार आहे. रासायनिक खतांचा तुटवडा भासेल किंवा पुरवठा झाला तरी जादा भावाने खरेदी करावी लागेल, अशी भीती आतापर्यंत शेतकऱ्यांना वाटत होती. याउलट सध्या रासायनिक खतांचे भाव स्थिर असले तरी महाबीजने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. महाबीजने सोयाबीनच्या दरात 40 टक्के वाढ केली आहे. म्हणजेच 30 किलो सोयाबीन बियाणांसाठी शेतकऱ्यांना सुमारे 1700 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. गतवर्षी महाबीजच्या सोयाबीनची गोणी 2,250 रुपये होती, मात्र आता तीच बॅग घेण्यासाठी शेतकऱ्यांना 3,900 रुपये मोजावे लागणार आहेत. ऐन खरीपाच्या पूर्वसंध्येला हा निर्णय घेण्यात आल्याने शेतकऱ्यांना हंगाम सुरू होण्यापूर्वीच दरवाढीचा सामना करावा लागणार आहे.

असे राहणार आता महाबीजच्या बियाणांचे दर

महाबीजच्या बियाण्यांना शेतकऱ्यांकडून मोठी मागणी आहे. मात्र, यंदा सोयाबीनच्या त्याच बियाणासाठी शेतकऱ्यांना जास्त किंमत मोजावी लागणार आहे. महाबीज प्रशासनाने बियाण्याचे दर जाहीर केले आहेत. त्यामुळे सोयाबीनच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गतवर्षी 30 किलो सोयाबीन बियाणाची किंमत 2,250 रुपये होती, मात्र आता तीच बॅग 2 हजार रुपयांनी वाढली आहे. गतवर्षी काढणीच्या वेळी पावसामुळे अपेक्षित कच्चे बियाणे मिळाले नाही. त्यामुळे महाबीजला पुन्हा उन्हाळी हंगामात बीजोत्पादनाचा कार्यक्रम सुरू करावा लागला होता.

यामुळे वाढले बियाणांचे दर

महाबीज बियाणे उत्पादन कार्यक्रम राबवत असताना सोयाबीनच्या दरावर काही टक्के बोनस देऊन कच्चे बियाणे खरेदी केले जाते. डिसेंबर ते जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होते. दरम्यान, प्रक्रिया करणे, पॅकिंग करणे आणि तयार बियाणे विक्रेत्यापर्यंत वाहून नेणे यासाठी होणारा खर्च लक्षात घेऊन दर वाढविण्यात आले आहेत. या सर्व बाबींचा परिणाम सोयाबीन बियाण्यांवर झाला आहे.

शेतकऱ्यांकडे पर्याय काय ?

वाढत्या महागाईमुळे असे होणे साहजिक आहे. खते, बियाणांसाठी शेतकऱ्यांना जादा पैसे मोजावे लागणारच, पण पिकवलेल्या शेतीमालाच्या किमतीचे काय? हा प्रश्न उरतोच. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी घरगुती बियाण्यांवर भर देणे गरजेचे आहे. यासाठी पेरणीपूर्वी बियाणांची उगवण पाहिली, तर उत्पादनात घट होत नाही. मात्र, पेरणीचे अगोदर नियोजन केल्यास शेतकऱ्यांचे श्रम व खर्चही कमी होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरीच पिकवलेल्या बियाण्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
बाजार समितीच्या मार्केट यार्डात नाफेडची ‘पॅकिंग’! शासनाच्या तिजोरीला लावला चुना..