कोल्हापूर: डॉक्टर तरुणीची आत्महत्या : सिरिंज, बाटली जप्त

Kolhapur doctor
Photo: Social Media

कोल्हापूर: शहरातील एका खासगी रुग्णालयात सर्जन म्हणून काम करणाऱ्या डॉ. अपूर्वा प्रवीणचंद्र हेंद्रे (वय ३०, रा. ताराबाई पार्क) यांनी इंजेक्शन टोचून आत्महत्या केली. घरापासून थोड्या अंतरावर रस्त्याकडेला एका बाकड्यावर रविवारी सकाळी ६ वाजता त्यांचा मृतदेह सापडला. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, मृतदेहाजवळ सिरिंज व रिकामी इंजेक्शनची बाटली पोलिसांना मिळून आली आहे.

शहरातील एका खासगी रुग्णालयात सर्जन, तसेच वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या डॉ. अपूर्वा हेंद्रे यांनी अल्पावधीतच वैद्यकीय क्षेत्रात आपले नाव कमावले होते. त्या अविवाहित असून, ताराबाई पार्क येथे आई वडील, भाऊ अशा कुटुंबात राहत होत्या. शनिवारी रात्री मित्रांसमवेत हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्या होत्या. मध्यरात्री त्या घरी आल्या होत्या. त्यानंतर काही काम आहे, असे सांगून रात्रीच घरातून बाहेर पडल्या. त्या उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला; परंतु त्या मिळून आल्या नाहीत.

रविवारी सकाळी सहा वाजता फिरायला गेलेल्या लोकांना ताराबाई पार्क परिसरातील एका मॉलपासून थोड्या अंतरावर रस्त्याकडेला असलेल्या बाकड्यावर डॉ. अपूर्वा हेंद्रे बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या दिसल्या. लोकांनी कुटुंबीयांना सांगितल्यानंतर भावाने त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने सीपीआर रुग्णालयात आले. सपोनि इंगवले व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेहाजवळ सिरिंज व इंजेक्शनची रिकामी बाटली। मिळाली आहे. त्यामुळे अपूर्वा यांनी स्वतः इंजेक्शन टोचून घेतले असावे, असा पोलिसांचा कयास आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही.
नैसर्गिक शेती करा, हाच आर्थिक यशाचा आधार – नरेंद्र मोदी, सुरतचे नैसर्गिक शेतीचे मॉडेल देशासाठी आदर्श