कांदा मार्केट बंद ठेवणे शेतकरी हिताचे नाही, १६ ऑगस्टला बाजार बंद ठेवण्यास विरोध; माल घेऊन येण्याचे आवाहन

onion market
Photo: Social media

नाशिक: शेतकऱ्यांनी दोन महिन्यांपासून चाळीत साठविलेल्या कांद्याचे आता नुकसान होऊ लागले आहे. आजच साठवलेल्या कांद्याचे ४० टक्के नुकसान होऊ लागले आहे. अशा स्थितीत कांदा मार्केट बंद ठेवणे शेतकरी हिताचे ठरणारे नाही.

यामुळे १६ ऑगस्ट रोजी कांदा मार्केट बंदला शेतकरी संघटनेचा पाठिंबा नाही. शेतकऱ्यांनी नियमितपणे आपला माल मार्केटमध्ये विक्रीसाठी घेऊन यावा, असे आवाहन शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष शंकरराव ढिकले यांनी निवेदन प्रसिध्दीस दिले आहे. कांदा चाळीतच ४० टक्के नुकसान होत आहे.

अशा परिस्थितीत मार्केट बंद ठेवून शेतकरी संघटनेला शेतकऱ्यांचे नुकसान होऊ द्यायचे नाही. शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये आपला कांदा आणला नाही तर मार्केट बंद ठेवून व्यापारी साठवलेला कांदा भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करून देतील, त्याचा फायदा व्यापारीच घेतील, आज मालाची आवक भरपूर आहे. बंदच्या भीतीने काही शेतकरी माल विक्री करण्याची घाई करीत आहेत. यामुळे कांदा दर उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाजार बंद करून कोणताही फरक पडणार नाही. शिवाय पुढील महिन्यात कर्नाटक व राजस्थानचा लाल कांदा मार्केटमध्ये येण्यास सुरुवात होणार आहे.

कोणत्याही परिस्थितीत शेतकरी संघटनेला शेतकऱ्यांचे नुकसान होऊन द्यायचे नाही. त्यामुळे शेतकयांनी आपला माल मार्केटला विक्रीसाठी आणवा, असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित पाटील बहाळे, शेतकरी संघटना कार्याध्यक्ष शंकरराव ढिकले यांनी केले आहे.
आणखी वाचा : Tomato Cultivation: टोमॅटो लागवडीतील खर्च कमी करण्यासाठी महिला शेतकरीने स्वतः सुरू केली बियाणांची निर्मिती, आता वर्षाकाठी मिळविते लाखोंचे उत्पन्न