Homeताज्या बातम्याउत्तर प्रदेश विधान परिषदेच्या ३६ पैकी ३३ जागांवर ‘कमळ'

उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या ३६ पैकी ३३ जागांवर ‘कमळ’

लखनौ : उत्तर प्रदेश विधान परिषदेतील ३६ पैकी ३३ जागांवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत १११ जागा जिंकणाऱ्या समाजवादी पक्षाच्या हाती या निवडणुकीत भोपळा लागला, तर काँग्रेस व बसपाचीही मोठी निराशा झाली. या निकालामुळे राज्य विधिमंडळाच्या १०० सदस्यीय वरिष्ठ सदनात भाजप ६७ जागांसह सर्वशक्तिमान पक्ष ठरला आहे.

मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील पराभवाने भाजपला मोठा धक्का लागला आहे. सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने तसेच योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या ३६ पैकी ९ जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यानंतर उर्वरित २७ जागांसाठी शनिवारी झालेल्या मतदानाचा निकाल मंगळवारी जाहीर झाला.

या प्रचंड विजयाने जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व, राष्ट्रवाद, विकास व सुशासनासोबत असल्याचे पुन्हा सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. भाजपला यश न मिळालेल्या जागांमध्ये वाराणसी, आझमगड व प्रतापगड या तीन जागांचा समावेश आहे. वाराणसी व आझमगडमध्ये अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Recent Post