Homeताज्या बातम्यामहागाईने गाठला आठ वर्षांचा उच्चांक; एप्रिलमध्ये महागाई दर ७.७९ टक्क्यांवर

महागाईने गाठला आठ वर्षांचा उच्चांक; एप्रिलमध्ये महागाई दर ७.७९ टक्क्यांवर

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने देशातील पेट्रोलियम पदार्थांचे दर गगनाला भिडले आहेत. त्याचे थेट परिणाम महागाईवर होत असून अन्नधान्यांच्या किमती वधारल्याने महागाईने तब्बल आठ वर्षांचा उच्चांक गाठला आहे. एप्रिल महिन्यात महागाई दर ७.७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. महागाईचा आलेख सारखा वाढताना दिसत असून मार्चच्या तुलनेत किरकोळ महागाईमध्ये एक टक्क्याने वाढ झालेली आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये किरकोळ महागाईमध्ये वाढ झालेली असून मार्चमध्ये ६.९५ टक्के असलेली महागाई वाढून ती एप्रिलमध्ये ७.७९ टक्के इतकी झाली आहे. सध्या देशभरात पेट्रोल, खाद्यपदार्थ आणि गॅसचे दरही वारंवार वाढत आहेत. याच वाढत्या भावाचा परिणाम किरकोळ महागाई वाढण्यासाठी झाला आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेला रिटेल महागाई दर दोन ते सहा टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आकडेवारीनुसार, अन्नधान्य महागाई जी ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (सीपीआय) जवळपास निम्मी आहे, ती आता एप्रिलमध्ये उच्चांकावर पोहोचली आहे.

भाजीपाला आणि खाद्यपदार्थाच्या किमतीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे त्यात आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, २०२१ च्या एप्रिलमध्ये महागाईचा दर हा फक्त ४.२१ टक्के इतका होता. २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये किरकोळ महागाई दरामध्ये ३.५३ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. सध्या देशात महागाईचा आलेख वाढत असून खाद्यपदार्थ आणि पेट्रोलच्या वाढत्या भावाचा परिणाम होऊन किरकोळ महागाईमध्ये वाढ होत आहे.

औद्योगिक उत्पादनाचा वेग मंदावला
देशातील औद्योगिक उत्पादनाचा वेग मंदावला आहे. प्रामुख्याने विनिर्माण क्षेत्रातील कमजोर प्रदर्शनामुळे मार्च २०२२ मध्ये औद्योगिक उत्पादनाने अवघ्या १.९ टक्क्यांनी वाढ नोंदवली. मार्च २०२१ मध्ये हा आकडा २४.२ टक्के इतकी होती. मार्च-२०२२ मध्ये खान उत्पादनात चार टक्क्यांनी वाढ नोंदवली. विनिर्माण क्षेत्रातील उत्पादनाने अवघ्या ०.९ टक्क्यांनी वाढ नोंदवली. मागील वर्षी याच कालावधीत ही संख्या २८.४ टक्के इतकी होती.
कापूस, सोयाबीन उत्पादन वाढीसाठी सरकारची विशेष योजना

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Recent Post