कापसाच्या लागवडीत गतवर्षीपेक्षा वाढ; विक्रमी दराचा परिणाम

cotton farmer
फोटो: सोशल मेडिया

बीड: यंदा कापसाला १२ हजार प्रतिक्विंटल असा विक्रम दर मिळाला. याचा परिणाम लागवडीवर झाला असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा कापूस लागवड वाढली आहे. अशी माहिती कृषी दुकानदारांनी दिली. गतवर्षी कापूस बियाणे शिल्लक होते परंतु यंदा मागणी वाढल्याने तुरळक तुटवडा जाणवला. यंदा ३० ते ३५ टक्के क्षेत्रावर कापूस लागवड झाली असल्याचं अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत.

कोरडवाहू शेतकऱ्यांच्या आयुष्यात आर्थिक सुबत्ता कापसाने आणली असून, या पिकाला पांढरं सोनं म्हणून ओळखले जाऊ लागले. परंतु गतवर्षी सोयाबीनला ऐतिहासिक असा प्रतिक्विंटल ११ ते १२ हजार दर मिळाला. हे दर व खर्च, मेहनत, वेळ हे कापसाच्या तुलनेत सर्वच कमी लागत असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिली. कापसाची लागवड घटून तो अवघ्या ५ ते १० टक्क्यांवर आली होती. मात्र दराचा प्रवास यावर्षी उलटं झाला. नवीन सोयाबीन शेतकऱ्यांच्या पदरात पडताच १२ हजारांवरुन घसरुन ८ हजारांवर आले. सतत घसरत तो सध्या मील चा दर ६३०० वर तर इतर ठिकाणी ६ हजारांवर आले. हे दर उच्च दर्जाचे असून माती मिश्रीत अथवा भिजलेले असेल तर फार ६ हजारांच्या आत आहेत. कापसाचे अंतर्राष्ट्रीय पातळीवर उत्पादन कमी झाले. भारतात ही परतीचा पाऊस, बोंड अळीचा प्रादुर्भाव, घटलेली लागवड पाहता उत्पादन कमी झाले. याचा सरळ दरांवर परिणाम झाला. जो कापूस शेवटपर्यंत ही कधी सात हजारांच्या पुढे सरकला नाही.

तो यावर्षी सुरवातीलाच ८ हजाराने खरेदी केला गेला. वाढत जात तो काही दिवस १४ व १५ हजारांवर पोहोचला परंतु हा दर बोटांवर मोजता येतील इतक्याच शेतकऱ्यांना मिळालं. पण १२ हजार दर हा कायम राहिल्या सारखा होता. अनेक शेतकऱ्यांना हा दर मिळाला आहे. हा आतापर्यंतचा ऐतिहासिक असा कापसाचा दर ठरला आहे. या दराचा परिणामामुळे शेतकरी पुन्हा कापसाकडे वळाल्याचे दिसून येत आहे. यावर्षी कापसाच्या बॅगला चांगली मागणी असून त्यावरून ३० ते ३५ टक्के क्षेत्रावर कापूस लागवड झाली असल्याचा दावा सुभाष ढाकणे (कृषी दुकानदार) यांनी केला आहे..

शेतकऱ्यांचे कापसाकडे दुर्लक्ष का?
कापूस हे नगदी पीक असून, यामुळेच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. परंतु डबल बीटी बियाणे असूनही कापसावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो. विशेष म्हणजे बोंड अळीने शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे कापसाचा उतारा घटला आहे. बॅगला जिथे कमीत कमी ६ ते ७ क्विंटल उत्पादन मिळायचे ते आता १ ते २ क्विंटलवर आले आहे. उत्पादन घटले हेही एक कापसाकडे दुर्लक्ष होण्याचं महत्त्वाचे कारण आहे. यामुळे कापूस बियाणे चांगले येत नसल्याचा आक्षेप आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले बियाणे मिळावे याकडे शासन व प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.
बंदीनंतरही भारताने १८ लाख टन गहू अनेक देशांना केला निर्यात