Homeताज्या बातम्यामालाला भाव मिळाला नाही तर गोदामात साठवणूक करा! शेतकऱ्यांना आवाहन

मालाला भाव मिळाला नाही तर गोदामात साठवणूक करा! शेतकऱ्यांना आवाहन

जालना : ज्या वेळी मालाला भाव मिळत नाही, त्यावेळी माल साठवणूक करता यावी, यासाठी जिल्ह्यात ५ हजार ९४२ मेट्रिक टन क्षमतेचे १९ गोदाम बांधण्यात आले आहेत. हे गोदाम पोकरा योजनेतून शेतकरी उत्पादक कंपन्यांनी बांधल्याची माहिती आत्माच्या प्रकल्प संचालक तथा उपविभागीय कृषी अधिकारी शीतल चव्हाण यांनी दिली.

कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्या योजनांपैकी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा ही योजना देखील राबविली जाते. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील

साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी आत्माच्या पोकरा योजनेच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात असून, धान्य साठवून क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. पर्यायाने बाजार भावावर नियंत्रण राहणार आहे, कृषी व्यवसाय क्षेत्रात अत्यंत कमी प्रमाणात गाव पातळीवर गुंतवणूक होत असते, कच्चा मालाला साठवणुकीअभावी बाजारभाव मिळत नाही, आणि मिळेल त्या भावात शेतकरी आपला शेतमाल विकतो. पर्यायाने बाजारभावातील चढउताराने शेती फायद्यात येत नाही.

देशातील गोदामांमध्ये एकवाक्यता रहावी आणि यामाध्यमातून चांगली वितरण साखळी निर्माण होण्यासाठी गोदाम विकास व सनियंत्रण कायदा अस्तित्वात आला आहे. जिल्ह्यात पोकरा योजनेतून शेतकरी उत्पादक कंपनी बचत गटांसाठी १९ गोदामे बांधण्यात आली असून, ही गोदामे शेतकऱ्यांचा माल साठवणुकीसाठी फायदेशीर ठरणार असल्याची माहिती आत्माच्या प्रकल्प संचालक तथा उपविभागीय कृषी अधिकारी शीतल चव्हाण यांनी दिली.

पोकरा योजनेतून जिल्ह्यात १९ शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी बचत गटांनी गोदाम बांधकामासाठी अर्ज केले होते. त्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यामाध्यमातून कृषी मालाची वितरण साखळी चांगल्या पद्धतीने विकसित व्हावी, सर्व गोदामांची अधिकृत नोंदणी केलेल्या, शेतकऱ्यांना गोदामात ठेवलेल्या आपल्या मालाची ई-वखार पावती उपलब्ध व्हावी. सोबतच या पावतीवर शेतकऱ्यास कर्ज उपलब्ध व्हावे, या व्यापक उद्देशाने गोदाम विकास व सनियंत्रण कायदा अस्तित्वात आला आहे.

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी व बचत गटांनी बांधलेल्या या गोदामात शेतकऱ्यांना आपला कृषी माल ठेवता येणार असून, ज्यावेळी चांगले भाव असतील त्यावेळी तो विकता येईल. पोकरा योजनेतून १९ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अर्ज केले असून, त्यांना ६० टक्के अनुदान बांधकामावर उपलब्ध करून दिले आहे. प्रत्येकी ३०० टनांचे हे गोदाम राहणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी भाडे देऊन गोदाम वापरावे

१,२०० मेट्रिक टन इतक्या क्षमतेचे गोदाम अनुदान वितरण प्रक्रियेत आहे. एकूण क्षमता ५,९४२ मेट्रिक टन इतकी असून, १९ गोदाम उभारणीसाठी २५५.४८ लाख रुपये पोकराच्या माध्यमातून वितरित करण्यात आले आहेत. या गोदामांचे व्यवस्थापन गोदाम कायद्यांतर्गत होणार आहे.

त्यासाठी गटांची अधिकृत नोंदणी या कायद्यांतर्गत केली जाणार आहे. बचत गट आपले गोदाम शेतकऱ्यांना त्यांचा माल ठेवण्यासाठी उपलब्ध करून देतील. यासाठी गोदाम वापराच्या भाडे स्वरूपात बचत गटांना उत्पन्न मिळेल. यामुळे बचत गट व शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याची माहिती आत्माच्या प्रकल्प संचालक तथा उपविभागीय कृषी अधिकारी शीतल चव्हाण यांनी दिली.
उच्च शिक्षणानंतर शेतीला दिले प्राधान्य! प्रशांत पटवर्धन यांचे शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Recent Post