मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना भावनिक साद घातल्यानंतरही शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, दादाजी भुसे हे एकनाथ शिंदे गटात सामील होण्यासाठी गेल्याचे सांगण्यात येत असताना त्यांच्या निकटवर्तीयांकडून मात्र वेगळाच दावा केला जात आहे. या दोघांसह इतर काही आमदार हे ठाकरे यांचे दूत म्हणून गेले असून त्यांच्यामार्फत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद घ्यावे, असा निरोप दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
ठाकरे यांनी बुधवारी फेसबुक लाईव्हद्वारे शिंदे आणि बंडखोरांना भावनिक साद घातल्यानंतर काही तासांतच गुलाबराव पाटील यांच्यासह तीन आमदार गुवाहाटीत दाखल झाले. मात्र गुलाबराव पाटील हे बंडखोरांना सामील होण्यासाठी नाही, तर उद्धव ठाकरे यांचा संदेश घेऊन गुवाहाटीला पोहोचल्याचे त्यांच्या निकट सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्रीपदच घ्या, शिवसेना फुटली तर शिवसैनिक आमदारांना माफ करणार नाहीत, हा उद्धव ठाकरे यांचा निरोप पाटील यांनी शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवल्याचे सांगण्यात येते. पाटील गुवाहाटीत दाखल झाल्यानंतर शिंदे आणि बंडखोर आमदारांनी त्यांचे स्वागत केले.
दरम्यान, पाटील यांनी गुवाहाटीला जाण्यापूर्वी ठाकरे यांना भाजपासोबत जाण्याचा सल्ला दिला होता. आता आमदार शिंदे यांच्यासोबत जात असल्याने हित लक्षात घेऊन आपण त्या गटात जात असल्याचे सांगितले होते. याशिवाय दादा भुसेही ठाकरे यांचा निरोप देण्यासाठीच गुवाहाटीला पोहोचले असून योगेश कदम यांच्यामार्फत वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून बंडखोरांची समजून घालण्याचे प्रयत्न केले जात असल्याचेही सांगण्यात येत आहे.
– या तारखेपूर्वी हे काम करा, अन्यथा पंतप्रधान किसान योजनेच्या १२व्या हप्त्यापासून रहाल वंचित