कॅलिफोर्निया: गुगलचे को-फाऊंडर आणि जगातील सातव्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योजक सर्गेई ब्रिन दुसऱ्यांदा घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहेत. दुसऱ्या पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी त्यांनी कोर्टात अर्जही दाखल केला आहे.
सर्गेई ब्रिन यांची संपत्ती तब्बल ८.२३ लाख कोटी रुपये आहे. सर्गेई ब्रिन यांचे पहिले लग्न सन २००७ मध्ये अॅनी व्होजस्की यांच्याशी झाले होते. ॲनी ‘ट्वेंटीथ्री अँड मी’ या कंपनीच्या को-फाऊंडर आहेत. आठ वर्षे एकत्र राहिल्यानंतर सन २०१५ मध्ये सर्गेई ब्रिन यांनी अॅनी यांच्यापासून घटस्फोट घेतला. त्यानंतर सन २०१८ मध्ये ब्रिन यांनी निकोल शानाहान नावाच्या महिलेशी गुपचूप लग्न केले होते. त्याच वर्षी निकोल यांनी एका मुलीला जन्म दिला होता. तीन वर्षे निकोल यांच्यासोबत राहिल्यानंतर दाम्पत्यामध्ये वाद होऊ लागले. वाद विकोपाला गेल्याने सन २०२१ पासून ब्रिन आणि शानाहान स्वतंत्र राहू लागले होते. आता ब्रिन शानाहान यांच्यापासून कायदेशीररित्या नाते तोडू पहात आहेत.
सिक्रेट ठेवायचा होता डिव्होर्स
सर्गेई ब्रिन यांना आपला हा दुसरा घटस्फोट सिक्रेट ठेवायचा होता. त्यासाठी त्यांनी एक प्रायव्हेट जज आणि त्याचा सहाय्यक नेमला होता. प्रायव्हेट जजला एका तासाची फी ७३ हजार रुपये, तर त्याच्या सहाय्यकाला एका तासाचे २३ हजार रुपये एवढी फी ब्रिन देत आहेत.
– OMG! पाच दिवसांमध्ये दोन वेळा प्रेग्नंट राहिली ही महिला