Gold Price: नवीन वर्षात सोन्याचा भाव पोहोचणार 61,000 रुपयांवर, गेल्या 10 दिवसात 1200 रुपयांनी महागला!

gold market
Image Credit Source: Social Media

Gold Price Today:

सोन्याच्या किमतीत झपाट्याने वाढ होत आहे. सोन्याच्या भावाने 53600 रुपयांची पातळी ओलांडली आहे. गेल्या 10 दिवसांत सोन्याच्या दरात 1200 रुपयांची वाढ झाली आहे. सततच्या वाढीमुळे सोन्याच्या भावाने 27 महिन्यांच्या विक्रमी पातळी गाठली आहे. 18 ऑगस्ट 2020 रोजी सोन्याचा भाव 53815 रुपयांवर गेला होता.

डॉलरच्या घसरणीमुळे सोने महागले
याशिवाय 2021 मध्ये एकदाही सोन्याने 53,000 चा टप्पा गाठलेला नाही आणि 2022 मध्ये सोने पुन्हा एकदा नवीन विक्रम रचण्यासाठी सज्ज झाले आहे. डॉलरच्या घसरणीमुळे सोन्याच्या दरात जोरदार वाढ झाली आहे.

सोने 1261 रुपयांनी महागले
तज्ज्ञांच्या मते 2023 मध्येही सोन्याच्या किमतीत जोरदार वाढ होणार आहे. IBJA नुसार, शुक्रवारी सोन्याचा भाव 53,611 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर होता. तर 23 नोव्हेंबर रोजी सोन्याचा भाव 52320 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर होता. 23 नोव्हेंबरपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 10 दिवसांत सोन्याच्या दरात 1261 रुपयांनी वाढ झाली आहे.

सोने 60 ते 61 हजारांच्या पातळीवर जाईल
22 जानेवारीपासून चीनमध्ये नवीन वर्षाची तयारी सुरू होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. या काळात सोन्याची खरेदी सर्वाधिक होते. त्याच वेळी, जगभरातील केंद्रीय बँका सतत सोन्याची खरेदी करत आहेत. पुढील वर्षापर्यंत सोन्याचा भाव 60 ते 61 हजारांपर्यंत पोहोचू शकतो, असे कमोडिटी तज्ज्ञांचे मत आहे.

सोने खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा
तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करू शकता.
हे पण वाचा : Cotton Rate: कापूस बाजारात उसळी, आगामी काळात कापसाचे दर आणखी वाढण्याची शक्यता