आजीने धरले पाय, मांत्रिकाने चिरला गळा; गुप्तधनाच्या लालसेपोटी भाग्यश्रीचा खून

murder
Image Credit Source: Social Media

सातारा : पाटण तालुक्यातील देबेवाडी विभागातील करपेवाडी येथील महाविद्यालयीन भाग्यश्री माने वय १७ या युवतीचा गळा चिरुन हत्या करण्यात आली. आता या घटनेचा सुमारे साडेतीन वर्षांनी उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. सदरच्या युवतींचा खून हा गुप्तधन प्राप्ती तसेच घराची भरभराट होईल, या लालसेपोटी मांत्रीकाच्या नादाला लागून आजी व वडीलांनी युवतीचा नरबळी दिल्वाचे बुधवारी पोलिस तपासात समोर आले आहे. युवतीच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत मुख्य संशयित मांत्रिक विकास राठोड, फुलसिंग राठोड (रा. रा. कर्नाटक) रंजना साळुंखे (रा. करपेवाडी), कमल महापुरे (रा. खळे) यांना अटक केली आहे.

या घटनेत आणखी एकाचा पोलिस शोध घेत आहेत. युवतीच्या हत्येच्या घटनेत त्यावेळी विशेष म्हणजे स्वतः मुलीच्या आजीने युवतीचे धरले पाव अन मांत्रिकाने चिरला गळा, अशी धक्कादायक माहितीही आज पोलिस तपासात समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

गुन्ह्यात संशयित वाढण्याची शक्यता
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील करपेवाडी येथील महाविद्यालयीन भाग्यश्री माने वय १७ या युवतीचा गळा चिरुन हत्या करण्यात आली. या घटनेच्या तपासाकामी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या चौकशीत मोठी भूमिका बजावली. त्यामुळे संशयीतांनी गुप्तधनाच्या अमिषाने मांत्रिकाच्या सांगण्यानुसार मुलीच्या आजीच्यासमवेतच ऊसाच्या शेतात गळा चिरुन भाग्यश्रीचा खून केल्याचे त्यांनी कबूल केले. पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे. मुलीचे वडील जामिनावर असले तरी, ते ही या गुन्ह्यात संशयीत राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आणखी एक संशयीत निष्पन्न झाला असून पोलिस त्याच्या मागावर आहे. गुन्ह्यामध्ये आणखी संशयीत वाढण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तविली आहे.

मिरज प्रकरणाने उलगडला खून
सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील सुमारे ३५ ठिकाणी तपास केला. सव्वाशेहून अधिक जणांचे जबाब नोंदवले. त्यामध्ये कुटुंबातील व्यक्ती, नातेवाईक, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थिनी, मैत्रिणी, मांत्रिक आदींचा समावेश होता. संशयाची सुई भाग्यश्रीच्या कुटुंबीयांभोवती फिरत असल्याने त्यावेळी तिच्या वडिलांना अटकही केली गेली. त्यानंतर काही दिवसांनी त्यांची जामिनावर सुटकाही करण्यात आली होती. दरम्यान मिरज येथील एकाच कुटुंबातील ९ जणांची हत्या झाली होती. या खुनाच्या अनुषंगाने तपासाची चक्रे गतीमान केली असता करपेवाडी खून प्रकरणाचा छडा लागला.
मुलीने प्रेमविवाह केल्याने वडिलांनी संपविली जीवनयात्रा; नैराश्यातून स्वतःच्या शेतात गळफास लावून…