शेतकऱ्यांनो, 200 रुपये भरा अन् तीन हजार रुपये पेन्शन दर महिन्याला मिळवा

PM किसान
फोटो: सोशल मेडिया

बीड : शेतकऱ्यांसाठी केंद्र शासन विविध योजना राबवित आहे. त्यात प्रामुख्याने पीएम किसान योजने’चे नाव सर्वांना माहीत आहे. यासोबतच ‘पीएम किसान मानधन योजना’ही शेतकऱ्यांसाठी सुरू असून, या योजनेसाठी नियमित हप्ते भरल्यास ६० वर्षांनंतर प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळते. ही योजना २०१९पासून सुरू झाली असून, त्यासाठीची नोंदणी कॉमन सर्व्हिस सेंटर अर्थात सीएससीमध्ये करता येते.

‘पीएम किसान मानधन योजना’ दोन हेक्टर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्याला वयाच्या ६० व्या वर्षानंतर प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये म्हणजेच वार्षिक ३६ हजार रुपये पेन्शन म्हणून दिले जाणार आहेत. ‘पंतप्रधान किसान मानधन योजना’ केंद्राने ३१ मे २०१९ रोजी सुरू केली होती. पंतप्रधान किसान पेन्शन योजनेसाठी एक रुपयाही भरण्याची गरज शेतकऱ्यांना नाही. परंतु पंतप्रधान मानधन योजनेसाठी नियमित हप्ते भरावे लागतात.

कशी कराल नोंदणी ?
– प्रत्येक गावागावात कॉमन सर्व्हिस सेंटर अर्थात सीएससी सुरु झाली आहेत.
– त्याठिकाणी जाऊन पीएम किसान मानधन योजनेत सहभागी होऊ शकतात. त्यासाठी आधारकार्ड व बँक खाते किंवा पीएम किसान खाते असणे आवश्यक आहे.

किती भरावा लागेल दरमहा हप्ता?
पंतप्रधान किसान मानधन योजनेसाठी १८ ते ४० वर्षापर्यंतचे शेतकरी पात्र आहेत. नोंदणी केल्यानंतर १८ वर्षे वय असणाया | शेतकन्याला प्रति महिना ५५ रुपये हप्ता तर ४० वय असणाया शेतकन्याला २०० रुपये हप्ता भरावा लागतो. या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी नियमित हते ६० वर्षे होईपर्यंत भरावे लागतात. त्यानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन सुरु होते.

लवकर नोंदणी केल्यास कमी हप्ता
शेतकऱ्याने वयाच्या १८ व्या वर्षी हप्ता भरण्यास सुरुवात केली तर हप्ता कमी बसतो. १८ ते ४० दरम्यान वय असणाऱ्यांसाठी वेगवेगळे हप्ते आहेत. जेवढे वय अधिक तेवढा हप्ता जास्त असे गणित आहे. वास्तविकत: दरमहा हप्ता २०० रुपयांपर्यंत असतो. ५० टक्के शेतकन्याकडून तर ५० टक्के शासनाद्वारे प्रिमियम भरला जातो.

मृत्यू झाल्यास पत्नीला निम्मी पेन्शन
जर पॉलिसीधारक शेतकऱ्याचा काही कारणांमुळे मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला ५० टक्के रक्कम म्हणजेच दर महिन्याला १,५०० रुपये पेन्शनचा लाभ मिळत राहील. त्यामुळे शेतकऱ्याचा असा दुहेरी फायदा होणार आहे.

पेन्शन सुरु होण्यापूर्वीच मृत्यू झाल्यास ?
जर लाभार्थी शेतकऱ्याने योजना मध्येच सोडली किया पैसे जमा करणे थांबविले किवा पेन्शन सुरु होण्यापूर्वीच मृत्यू झाला तर जेवढे पैसे भरलेले असतील तेवढ्या रकमेवर, बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजाइतकी रक्कम व्याज म्हणून मिळेल.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
शेतकऱ्यांनी पीएम किसान मानधन योजनेत सहभागी झाल्यास त्यांना उतरत्या वयात पेन्शनचा लाभ मिळू शकतो. शेतकऱ्यांनी त्यांच्या नजीकच्या सीएससी सेंटरमध्ये जाऊन या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन अधिकायांनी केले आहे.
आणखी वाचा : PM Kisan: पीएम किसानच्या 12 व्या हप्त्यापूर्वी सरकारने केला मोठा बदल, तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे