‘नाफेड’ द्वारा पुन्हा २५ हजार क्विंटल खरेदीचे ‘टार्गेट’, शेतकरी प्रतीक्षेत

NAFED
Photo: Social media

अमरावती : मुदतीपूर्वच नाफेडद्वारा केंद्र बंद करण्यात आल्याने नोंदणी केलेल्या एक लाख क्विंटल हरभऱ्याची खरेदी अद्याप बाकी आहे. आता नाफेडद्वारा केवळ २७ हजार क्विंटल शेतमालाची खरेदी करण्यात येणार आहे व यासाठी दोन दिवसांपासून पुन्हा खरेदी सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे पेरणीच्या काळात शेतकरी केंद्रांवर प्रतीक्षेत आहे व बाकी शेतकऱ्यांचे काय, हा प्रश्न विचारला जात आहे.

एफसीआयकडे शिल्लक असलेले उद्दिष्ट ‘नाफेड’कडे वर्ग करण्यात आलेले आहे. तसेच पोर्टल बंद झाल्याने राहिलेली लॉट एंट्री प्रलंबित आहे. त्या हरभऱ्याची लॉट एंट्री करण्यास पुन्हा प्राधान्य देण्यात आलेले आहे.

राज्यात शासन केंद्रांवर हमीभावाने हरभरा खरेदी करण्यासाठी १८ जून ही मुदत दिलेली असताना २ जूनला पोर्टल बंद करण्यात आले. त्यामुळे १६९ वाहने खरेदीअभावी केंद्रात उभी आहेत. तसेच पुढील सहा दिवसांचे एसएमएसदेखील शेतकऱ्यांना देण्यात आले होते. या सर्वांची पहिल्यांदा खरेदी होणार आहे. त्याची प्रतीक्षा होत आहे.

डीएमओ अंतर्गत केंद्रांचे उद्दिष्ट
जिल्ह्यात डीएमओकडील अचलपूर केंद्रांवर १,५९० विचटल, चांदूर रेल्वे ७,०००, दर्यापूर २,३५८, धारणी ३,१०६, नांदगाव खंडेश्वर १,८५७ क्चिटल, तिवसा ७,१७९ क्विटल, जयसिंग अचलपूर २,६९२ क्विटल व नेरपिंगळाई केंद्राला १,७३३ क्विटल असे एकूण २७,५२६ क्विटल पेंडिंग लॉट एंट्रीसह नवे टार्गेट राहणार असल्याचे सहकार विभागाने सांगितले.
जिरेनियम शेतीने शेतकऱ्याची अर्थिक उन्नती! तेल निर्मिती प्रकल्पाला कृषी सहसंचालकांची भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here