शेती खरेदीचा व्यवहार झाला, फेरफार आता ऑनलाइन करा

land
photo: social media

सांगली : शेती किंवा रहिवासी जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहाराची फेरफार नोंद आता ऑनलाइन स्वरूपात केली जात आहे. व्यवहाराबद्दल कोणत्याही प्रकारचा आक्षेप किंवा तक्रार नसेल, तर मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारानंतर 30 दिवसांच्या आत फेरफार केला पाहिजे असे शासनाचे आदेश आहेत. जिल्ह्यात २०१८ पासून सर्व फेरफार नोंदणी ऑनलाइन स्वरूपातच केली जात आहे, त्यामुळे नोंदणीसाठीची टाळाटाळ किंवा विलंब कमी झाला आहे.

कोणतेही सबळ कारण नसताना फेरफार नोंदणीत ३० दिवसांपेक्षा जास्त विलंब झाला असेल, तर पक्षकार सक्षम अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार दाखल करू शकतो. चालू वर्षात एकूण ३७ हजार ८० फेरफारच्या ऑनलाइन नोंदी झाल्या आहेत. सर्वाधिक म्हणजे ७ हजार ७२१ फेरफार मिरज तालुक्यात नोंद झाले आहेत. फेरफार नोंदणी मोहिमेत पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागातील नोंदणी केली. दुसऱ्या टप्प्यात सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्राची नोंदणी हाती घेण्यात आली.

कारण काय…

खरेदी-विक्रीतील फसवणूक, प्रलंबित सुनावण्या, नोटीस बजावण्यातील विलंब, नोटिसीनंतरही हरकती वेळेत न येणे अशा अनेक कारणांनी फेरफार नोंदीबाबत तातडीने निर्णय होत नाहीत. यामुळे फेरफार प्रलंबित राहत आहेत.

३० दिवसांच्या बंधनाचे काय?

खरेदी-विक्रीचा दस्त सादर केल्यानंतर त्याची फेरफार नोंदणी शासन नियमानुसार ३० दिवसांत पूर्ण होणे आवश्यक आहे, अन्यथा तक्रार करता येते.

महापालिका क्षेत्राची नोंदणी दुसऱ्या टप्प्यात

आजअखेरच्या सर्व फेरफारच्या ऑनलाइन नोंदणीसाठी पहिल्या टप्प्यात ग्रामीण भाग निवडला. दुसऱ्या टप्प्यात महापालिका क्षेत्राचे काम सुरू झाले. महापालिका क्षेत्राचा समावेश मिरज तालुक्यात आहे.
दोन्ही वर्षांचे भिजत घोंगडे, यंदाच्या पीक विम्याचे काय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here