Homeताज्या बातम्याराज्यावर पुन्हा अस्मानी संकट; 'या' जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा

राज्यावर पुन्हा अस्मानी संकट; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा

Weather Update : राज्यात एकीकडे कडक ऊन तर दुसरीकडे पाऊस शी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात असनी चक्रीवादळाचा मान्सूनवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

या चक्रीवादळामुळे येत्या काही दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाची दाट शक्यता आहे.
वाचा: कापूस बियाण्यांचा पुरवठा १ जूननंतर, कृषी विभागाच्या निर्णयामागे दडलंय काय?

या जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस

13 मे रोजी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे आणि नगर जिल्ह्यातही 13मेपर्यंत पाऊस अपेक्षित आहे.

कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढचे दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे बागायदारांना मोठी नुकसान होऊ शकतं. 

या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम

अकोला, अमरावती जिल्ह्यांत पुढील चार दिवस कडक उष्णतेची लाट येणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाचा: पांढऱ्या सोन्याला डाग ‘बोंडअळी’चाच! मॉन्सूनपूर्व कापूस पेरणी टाळल्यास लागेल लगाम

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Recent Post