रत्नागिरी : कोकणातील दमट हवामानात मसाला वर्गिय पिके चांगल्या प्रकारे होतात. दालचिनी हे पिक चांगला पैसा देणारे आहे. लावगडीसह पिकाचे योग्य संगोपन आले, शिवाय काढणी व वाळविण्याचेही विशिष्ट तंत्र असून ते अवगत करणे गरजेचे आहे. दालचिनीचे झाड तोडून त्यापासून साल काढावी लागते.
लागवड केल्यापासून तिसऱ्या वर्षी नोव्हेंबर ते ८ मे च्या दरम्यान दालचिनीचे झाड तोडून साल काढावी. त्यानंतर चौथ्या वर्षी झाड तोडणीसाठी येत नाही. त्यानंतर मात्र पुढील वर्षी प्रत्येक झाडाच्या तयार फांद्या काढून त्याची साल काढता येते. तिसऱ्या वर्षी साल काढताना झाड तोडण्यापूर्वी दालचिनीची साल खोडापासून सहज सुटी होते की नाही ते चाकूच्या सहाय्याने पाहणे गरजेचे आहे.
त्यासाठी धारदार चाकूने छोटासा त्रिकोणी अगर चौकोनी काप घेऊन खात्री करावी. साल सहज निघत असेल अशावेळी झाड तोडावे. साल सहज सुटत नसेल तर साधारणपणे आठवड्याच्या अंतराने तपासणी करत रहावे. साल सहजगत्या सुटते अशी खात्री झालेनंतर तिसऱ्या वर्षी साल काढताना खोडाचा २० सेंटीमीटर भाग ठेवून करवतीच्या/कोयत्याच्या सहाय्याने कापून त्यानंतर फांद्यांचे आवश्यकतेनुसार २ ते २.५ फुटाचे तुकडे करावेत.
संबंधित फांद्याच्या तुकड्यांवरील खडबडीत साल हलक्या हाताने चाकूच्या सहाय्याने खरवडून काढावी म्हणजे आतील पिवळसर चांगली दिसेल. अशा फांद्याच्या तुकड्यावर दोन उभे काप एकमेकांच्या विरूध्द दिशेला द्यावेत. नंतर चाकूच्या बोथट बाजूचा वापर करून साल सैल करून काढावी. फांद्या तोडल्यापासून शक्यतो ताबडतोब साल काढावी.
साल तोडल्यानंतर शिल्लक बसलेल्या बुंध्यावर असंख्य धुमारे फुटतात. हे धुमारे साधारण दीड ते दोन वर्षाचे ( लागवडीपासून पाचव्या वर्षी) झाले की काढण्यायोग्य होतात. झाडांवरील अंगठ्याइतक्या जाड व भुरकट रंगाच्या जून झालेल्या फांद्या, धारदार कोयत्याने/करवतीने, खोडाचा थोडा भाग शिल्लक ठेवून तोडाव्यात. सावलीत वाळवाव्यात.
डांगरमळे झाले हद्दपार, काकडीला आले अच्छे दिन