Homeताज्या बातम्यादर घटल्याने मिरची उत्पादक शेतकरी चिंतेत; वाढले उत्पादन, खर्चही काढणे कठीण

दर घटल्याने मिरची उत्पादक शेतकरी चिंतेत; वाढले उत्पादन, खर्चही काढणे कठीण

वसई: शेतकरी बागायतीबरोबर मिरची लागवड करण्याकडे वळला आहे. मिरचीला चांगला दर मिळत असल्याने या भागात मिरची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकरी करीत होता; पण सध्या मिरचीचे उत्पादन वाढू लागल्याने मिरचीला भाव कमी मिळत आहे, परिणामी आदिवासी शेतकरी चिंतेत पडला असून, येणाऱ्या उत्पन्नातून उत्पादन खर्च काढायचा कसा, हा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे.

तलासरी तालुक्यात एकूण खातेदार संख्या ११९४१ असून, आदिवासी शेतकरी ७३९५ आहेत. तालुक्यात ३४८.२५ हेक्टर क्षेत्रात भाजीपाला लागवड करण्यात येते. त्यापैकी फक्त मिरची लागवडीचे क्षेत्र हे १७४.५ हेक्टर असल्याने किती मोठ्या प्रमाणात शेतकरी मिरची लागवडीकडे वळला हे दिसून येते. परंतु, कृषी विभागाकडून म्हणावे तितके सहकार्य मिळत नाही.

सुरुवातीला मिरचीला चांगला भाव मिळत होता. १२० ते १४० रुपये मिळत असल्याने शेतकरी खूश होता. त्याचा आर्थिक स्तरही उंचावत होता; पण सध्या मिरचीचे उत्पादन सर्वच भागत वाढल्याने मोठ्या त्यातच तलासरी भागातील प्रमाणात मिरची उत्पादन वाढले. शेतकऱ्यांच्या माथी निकृष्ट बियाणे मारल्याने मिरची उत्पादन कमी निघून त्याचा दर्जाही कमी प्रतीचा आल्याने मिरचीला भाव कमी मिळाल्याने शेतकरी वर्ग नाराजी आहे.
अवकाळीची कांदा उत्पादकाला धास्ती! माल झाकण्यासाठी प्लॅस्टिक कागदाचे झाकण

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Recent Post