दोहा : अल कायदा या मुस्लीम दहशतवादी संघटनेचा म्होरक्या, आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेन आपल्या पाळीव कुत्र्यांवर केमिकल वेपन्सची टेस्टिंग करत असे. हा खळबळजनक गौप्यस्फोट ओसामाचा मुलगा उमर याने केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये उमर याने असेही सांगितले की, तो स्वतः आपल्या बापाच्या अशा क्रूरपणाने व्यथित झाला होता. उमर हा ओसामा बिन लादेनचा सर्वात मोठा मुलगा आहे.
नुकताच तो आखाती देश कतारमध्ये आला असता ‘द सन’ या वृत्तपत्राने त्याची ही मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान उमरने सांगितले की, त्याच्या पित्याला म्हणजे ओसामा बिन लादेनला आपण त्याचा वारसा चालवावा, असे वाटत होते; पण त्याची असे काही करायची इच्छा नव्हती. उमर जेव्हा अफगाणिस्तानमध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता, तेव्हा ओसामा त्याला शस्त्रास्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देत. असे. ओसामाने त्यांच्या पाळीव कुत्र्यांवर केमिकल वेपन्सची टेस्टिंगही केली होती.
हे पण वाचा : क्रायोनिक्स टेक्नॉलॉजीने मुडदे होणार जिवंत? पुनर्जन्माच्या प्रतीक्षेत आहेत 600 मृतदेह