इंधन दरवाढीला केंद्र, राज्याकडून दिलासा; मात्र खाद्यतेलांचे दर वाढलेलेच

oil
Photo: Social media

मुंबई: इंधन दरवाढ आणि गॅस सिलेंडरच्या आगडोंबातून सर्वसामान्यांना केंद्राकडून काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, रोजच्या जेवणात लागणाऱ्या खाद्य तेलांचे दर मात्र वाढलेलेच आहेत. यामुळे आता सामन्यांना खाद्यतेलाचे दर कमी करून सरकार कधी दिलासा देणार असा प्रश्न विचारला जात आहे. बीडमध्ये सध्या सोयाबीन १७५ रुपये लिटर तर सूर्यफूल २०२ रुपये लिटरवर पोहोचले असून सद्यस्थितीत दर कमी होण्याची शक्यता नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

देशात इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर सर्वस्तरातून टीका होत होती. शनिवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल ९.५० तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त करत असल्याची घोषणा केली होती. तर राज्य सरकारने देखील पेट्रोल २.८ व डिझेल १.४४ रुपयांनी कमी केले आहे. त्यामुळे आता इंधनाचे दर कमी झाल्याने याचा जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवर मोठा परिणाम होईल असे संकेत केंद्र सरकारच्या वतीने दिले जात असताना खाद्य तेलांचे दर तूतांस तरी जैसे थे राहणार असल्याचे तेल विक्रेत्यांच्या वतीने सांगण्यात येते. सध्या सोयाबीन तेलाचा डब्बा २५४० रुपये तर सूर्यफूल तेलाचा डब्बा २९५० रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा भडका सहन करावाच लागत आहे.

तेलाचे भाव कमी होण्यास वेळ लागेल
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात जरी कपात करण्यात आली असली तरी खाद्यतेलांचे दर एवढ्या लवकर कमी होतील असे चित्र नाही. सोयाबनच्या दरात येत्या काही दिवसांत दिलासा मिळू शकतो मात्र सूर्यफुलाचे दर कमी होणार नाहीत. भारताला सूर्यफुलाच्या तेलाची निर्यात बाहेर देशातून होते. तसेच सोयाबीनच्या तेलाचे दर उतरण्यासाठीही वेळ लागणार असल्याचे व्यापारी वर्गातून सांगण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांचे आर्थिक गणित कोलमडले
इंधन दरवाढीच्या कपातीची सर्वत्र चर्चा असताना खाद्य तेलांचे दर स्थीर राहणार असल्याचे संकेत मिळू लागल्याने हॉटेल व खानावळीमधील (मेस) जेवणही स्वस्त होणार नाही हे स्पष्ट आहे. तसेच सिलेंडरवरील सबसिडी ही उज्वला गॅससाठी देण्यात येणार असल्यामुळे हॉटेलला लागणाऱ्या व्यावसायिक सिलेंडरचे दर आहे तेच राहणार आहेत. त्यामुळे इंधन दरवाढीचा फटका हॉटेल व मेस चालकांना बसत आहे. त्यांनी देखील त्यांचे दर वाढवले असून, याचा सर्वाधीक आर्थिक फटका सर्वसामान्य नागरिकांसह ग्रामीण भागातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना बसत आहे. तर, जेवणाचे भाव वाढल्यामुळे आर्थिक गणित देखील कोलमडलेले आहे.
खतांच्या किमतीत पुन्हा वाढ, डीएपी खताची किंमत 350 रुपयांनी वाढली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here