Homeक्रीडाकेरॉन पोलार्डची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

केरॉन पोलार्डची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

मुंबई: वेस्ट इंडीजचा मर्यादित षटकांचा कर्णधार केरॉन पोलार्डने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. याचवेळी त्याने जगभरातील खासगी टी-२० आणि टी-१० लीगमध्ये खेळत राहीन, असे त्याने स्पष्ट केले आहे.

३४ वर्षीय पोलार्डने २००७ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने त्याची शेवटची मालिका भारताविरुद्ध खेळली आहे. मुंबई इंडियन्सशी तो दीर्घकाळ करारबद्ध आहे. पोलार्डने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर निवृत्तीची घोषणा केली. दीर्घ चर्चेनंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. वयाच्या दहाव्या वर्षापासून वेस्ट इंडीजकडून खेळण्याचे माझे स्वप्न होते. आता टी-२० आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये १५ वर्षांहून अधिक काळ वेस्ट इंडीजचे प्रतिनिधित्व केल्याचा मला अभिमान आहे, असे त्याने म्हटले आहे.

सर्वात यशस्वी टी-२० क्रिकेटपटूंपैकी एक असलेला पोलार्ड वेस्ट इंडीजसाठी तितकासा यशस्वी ठरला नाही. त्याने १२३ एकदिवसीय सामन्यांमध्ये २६ च्या सरासरीने २७०६ धावा करत ५५ बळी घेतले. त्याने १०१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १५६९ धावा केल्या आणि ४४ बळी घेतले. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेच्या अकिला धनंजयाच्या एका षटकात ६ षटकार मारले आहेत. २०१२ मध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडीज संघाचा तो भाग होता. असे असले तरी त्याला कधीच कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Recent Post